Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल परिसरातील रहिवाशांना गुड न्यूज, म्हाडा देणार घराच्या चाव्या, वाचा सविस्तर

Elphinstone Bridge Parel News : मुंबईतील एल्फिन्स्टन येथे जुना पूल हटवून वरळी–शिवडी कनेक्टरसाठी डबलडेकर पूल उभारला जाणार आहे. या प्रकल्पात बाधित असलेल्या नागरिकांना लवकरच घराच्या चाव्या देण्यात येणार आहेत.
Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल परिसरातील रहिवाशांना  गुड न्यूज, म्हाडा देणार घराच्या चाव्या, वाचा सविस्तर
Elphinstone Bridge Parel NewsSaam tv
Published On
Summary
  • एल्फिन्स्टनचा जुना पूल हटवून डबलडेकर पूल उभारला जाणार

  • हाजी नुरानी व लक्ष्मी निवास या २ इमारती प्रकल्पात बाधित

  • ७८ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी ९० कोटी म्हाडाकडे जमा

  • पुढील २ दिवसांत MMRDA ला घरांचा ताबा हस्तांतर

एल्फिस्टन वासियांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एल्फिन्स्टन येथे सध्याचा पूल काढून वरळी- शिवडी कनेक्टरसाठी डबलडेकर पूल उभारला जाणार आहे. या पुलामुळे बाधित होणाऱ्या दोन इमारतींमधील रहिवाशांना लवकरच नव्या घराच्या चाव्या मिळणार असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

म्हाडा येत्या दोन दिवसांमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) घराचा ताबा देणार असून त्यादृष्टीने युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. त्यानंतर एमएमआरडीएकडून रहिवाशांना घरांचे वाटप करण्यात येणार आहे. एल्फिन्स्टन पुलाच्या कामामुळे येथील हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोन इमारती बाधित होणार आहेत.

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल परिसरातील रहिवाशांना  गुड न्यूज, म्हाडा देणार घराच्या चाव्या, वाचा सविस्तर
Crime News : दारू पाजली, डोळ्यात मिरची पावडर फेकली, नंतर हंटर आणि दगडाने ठेचलं; प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली पतीची हत्या

लक्ष्मी निवास या इमारतीत ६०, तर हाजी नुरानी या इमारतीत एमएमआरडीएने रहिवाशांसाठी सुरुवातीला ८३ घरांची निवड केली होती. आता मात्र एमएमआरडीएने म्हाडाकडे केवळ ७८ घरांची मागणी केली आहे. रेडिरेकनरच्या ११० टक्के दर याप्रमाणे ७८ घरांपोटी ९० कोटी रुपये नववर्षाच्या सुरुवातीला एमएमआरडीएने म्हाडाच्या तिजोरीत जमा केले आहेत.

Elphinstone Bridge : एल्फिन्स्टन पूल परिसरातील रहिवाशांना  गुड न्यूज, म्हाडा देणार घराच्या चाव्या, वाचा सविस्तर
Ajit Pawar : अजित पवारांची झेडपीची तयारी, निवडणुकीआधी मारला मास्टरस्ट्रोक, पुण्यात १, २ नव्हे तर ३ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती

पुढील दोन दिवसांत ही घरे एमएमआरडीएला सुपूर्द करण्यात येणार आहेत. या घरांच्या दुरुस्तीवर खर्च केलेले दीड कोटी रुपये मिळावेत, अशी मागणीही म्हाडाकडून करण्यात आली आहे. आमचे याच परिसरात पुनर्वसन करा, अशी रहिवाशांची मागणी होती. मात्र संबंधित रहिवाशांना दादर, माहीम, माटुंगा, वडाळा, प्रभादेवी, लोअर परळ या भागातील म्हाडाची घरे दिली जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com