Inspirational Story of Buldhana Family Saam Tv
महाराष्ट्र

Inspirational Story: अनाथांची माय! बुलढाण्यातील आजी अन् चार अनाथ नातींना बांधून दिलं हक्काचं घर

Inspirational Story of Buldhana Family: बुलढाण्यातील एका निराधार आजी आणि तिच्या नातींना घर बांधून देण्यात आले आहे. देवानंद पवार फाऊंडेशनने हे काम केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी

मायेची सावली देणारे या जगात फार कमी लोक आहेत.दुसऱ्यांना मदतीसाठी पुढे येणारे खूप कमी लोक असतात. परंतु आजही जगात माणुसकी शिल्लक आहे याचं उत्तम उदाहरणा बुलढाण्यात घडलं. बुलढाण्यातील एका व्यक्तीने म्हाताऱ्या आजीच्या कुटुंबाला मदत केली आहे. त्या व्यक्तीच नाव देवानंद पवार असे आहे.ते पेशाने शिक्षक आहे. त्यांची मुलगी माधुरी वकील आहे.

देण्यासाठी दानत लागते, अर्थात ती सर्वांकडेच नसतेही, तर दान देण्यासाठी आर्थिक परिस्थितीपेक्षा मानसिक स्थिती गरजेची असते हेही तितकेच खरे. मात्र देवानंद पवार व अॅड. माधुरी पवार हे बाप-लेक याला अपवाद ठरल्याचे दिसून आले. त्यांनी आपल्या देवानंद पवार मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून मेहकर तालुक्यातील बोथा येथील ७५ वर्षीय निराधार शोभा भालेराव आजीसह चार नातींसाठी हक्काचे घर बांधून दिले. एवढेच नव्हे तर त्यांना भांडीकुंडी व वर्षभर पुरेल एवढे अन्नधान्यही घेऊन दिले. या घराचा गृहप्रवेश सोहळा तालुक्यातील बोथा या दुर्गम गावी थाटामाटात पार पाडला. याप्रसंगी उपस्थितांच्या डोळ्यातून आपसूकच आश्रू तरळतांना दिसले.

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा ते मेहकर रोडवरील सिध्दांता आश्रमपासून दोन किलोमीटर अंतरावरील आडवळणावर असलेले बोथा हे तस दुर्गम गांव. याच गावात ७५ वर्षीय निराधार शोभा भालेराव आजी आपल्या चिमुकल्या चार नातीसह राहतात.

आठरा विश्व् दारिद्र्य पिच्छा सोडायला तयार नसतानाच, नातींचे मातृपितृक्षत्रही हरवलेले. त्यामुळे ७५ वर्षीय शोभा भालेराव आजी छातीचा कोट करून परिस्थितीशी चार हात करतेय व स्वतःसह नातींचे पालनपोषण करते.

याबाबत येथील संवेदनशील शिक्षक अमित शिंगणे यांना माहिती झाली. त्यांनी या कुटुंबाशी संपर्क साधत तब्बल तीन वर्षापासून कोणत्या ना कोणत्या प्रकारे या कुटुंबाच्या मदतीसाठी हात पुढे ठेवला.

शोभा आजीला घरकुल मिळाले होते, परंतु धो धो पावसात ते वाहून गेल्याने त्या दहा बाय दहाच्या छोट्या पडक्या घरात वास्तव्य करीत होत्या, असे शिक्षक अमित शिंगणे यांनी सांगितले.

याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते देवानंद पवार व देवानंद पवार फाउंडेशनच्या अध्यक्षा अॅड. माधुरीताई पवार यांना मिळताच, अॅड. माधुरी पवार यांनी शिक्षक अमित शिंगणे यांच्यासह या निराधार कुटुंबाची भेट घेतली. तातडीने सूत्र हलवत त्यांनी आठ दिवसांत टिन शेडच्या टुमदार दोन खोल्या त्यांना बांधून दिल्या. एवढेच नव्हे तर त्यांना वर्षभर पुरेल एवढे अन्नधान्य, यासोबतच गादी, पलंग, पंखा, आरसा, कंगवा यास नित्यपयोगी सर्वच साहित्यदेखील घेऊन दिले. या नवीन घरात त्या चार अनाथ मुलीच्या वडिलांचा व आजोबाचा फोटो लावण्यात आला त्यावेळी थोडी समज असलेल्या चार मुली पैकी मोठी मुलगी ज्योती हिच्या डोळ्यात टचकन पाणी आल व त्यावेळी मन भरून आलं.

या घराचा गृहप्रवेश सोहळा परवा बोथा येथे थाटामाटात पार पडला. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, या भालेराव कुटुंबाला शासनस्तरावरून काय मदत करता येईल, याबाबत संबंधितांची बोलतो असे सांगताना त्यांनादेखील गहिवरून आले. यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्याम उमाळकर, माजी सभापती नंदकिशोर बोरे, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे, आशीष राहाटे यांनी मार्गदर्शनातून देवानंद पवार व अॅड. माधुरी पवार यांच्या सामाजिक उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT