CM Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखेर वर्षा बंगल्यावर, अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सपत्निक गृहप्रवेश

Devendra Fadnavis Finally Moves into Varsha Bungalow: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर चार महिन्यांनंतर अधिकृत निवासस्थान वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश केला आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर फडणवीसांनी सपत्नीक घरात पूजा करून गृहप्रवेश केला.
Fadnavis
FadnavisSaam
Published On

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर ४ महिन्यांनंतर सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर प्रवेश केला आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर पूजा करून प्रवेश केला. अमृता फडणवीस यांनी ट्वीटरवर गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत याची माहिती दिली.

विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, तरीही फडणवीस आपल्या परिवारासह सागर बंगल्यावरच राहत होते. महायुती सरकारमधील एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही ते वर्षा बंगल्यावर राहत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आपल्या परिवारासह सागर बंगल्यावर राहत होते. मात्र, अखेर आज त्यांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रवेश केला.

Fadnavis
SSC- HSC Result: दहावी-बारावीच्या निकालाची तारीख ठरली! बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती

अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटरवर फोटो शेअर करत कॅप्शन दिलं आहे, 'सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या मुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करून गृहप्रवेश केलाय. आजच्या दिवशी आणखी एक आनंदाची बातमी सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे. आमची सुकन्या दिविजा हिला दहावीच्या बोर्ड परिक्षेत ९२.६० टक्के गुण मिळाले आहेत' , अशी माहिती अमृता फडणवीस यांनी आपल्या पोस्टद्वारे दिली.

Fadnavis
Husband-Wife: नवरा बायकोमध्ये मध्यरात्री कडाक्याचं भांडण; बायको झोपायला गेली, नवऱ्यानं कात्री घेऊन केलं असं काही की..

देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्टीकरण

"एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगला रिकामा केल्यानंतर मला तिथं जायचं होतं. त्या बंगल्यावर काही छोटी-मोठी कामं होणार होती. या दरम्यान माझी मुलगी दहावीच्या परीक्षेच्या तयारीत होती. ती म्हणाली की, 'परीक्षा झाल्यावर आपण नवीन बंगल्यावर जाऊया', म्हणून मी तात्काळ तिथं शिफ्ट झालो नाही." असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं.

Fadnavis
Pune News: मशिदीमध्ये बाहेरील मुस्लिमांना नो एन्ट्री, पुण्यातील 'या' गावाकडून ठराव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com