Red Alert in Maharashtra: Flooded Roads, High Tides Threaten Coastal & Ghat Regions Saam TV News Marathi
महाराष्ट्र

Red Alert in Maharashtra : पाऊस आज कहर करणार, ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट, IMD च्या इशाऱ्यानंतर २ जिल्ह्यातील शाळा-कॉलेज बंद

Maharashtra Weather Red Alert News : राज्यात आज अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणापासून ते विदर्भापर्यंत अन् मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली.

Namdeo Kumbhar

  • रायगड, कोल्हापूर, सातारा घाटात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी

  • चंद्रपूर आणि भंडाऱ्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी घोषित

  • कोकण किनारपट्टीवर उंच लाटांचा धोका – मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई

  • गडचिरोलीसह विदर्भातील जिल्ह्यांना अतिवृष्टी व पुराचा धोका

Red alert in Maharashtra today : महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून सर्वदूर कोसळत आहे. पुढील ४८ तास राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. २५ आणि २६ जुलै रोजी महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभाकडून देण्यात आला आहे. कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यांसह सात जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी (IMD heavy rain warning for Konkan and Ghats) करण्यात आला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाल्याचे आयएमडीने सांगितलेय. कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत अन् घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

७ जिल्ह्यांना रेड अलर्ट - Which districts received red alert today in Maharashtra

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट भागात आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासासाठी सात जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा - Coastal safety advisory for fishermen

मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्गात पुढील ४८ तास पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून मच्छीमाराला समुद्रात न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. किनारपट्टीला ३.८ ते ४.७ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आलाय. पुढील सूचना मिळेपर्यंत लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

चंद्रपूर-भंडाऱ्यातील शाळा-कॉलेजला सुट्टी - School and college holiday due to rain in Chandrapur Bhandara

दोन दिवसांपूर्वी विदर्भात पावसाने हाहाकार घातला आहे. भंडारा आणि चंद्रपूरमध्ये मागील ४८ तासांपासून जोरदार पाऊस पडत आहेत. त्यातच आता आजही हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात हवामान विभागानं रेड अलर्ट दिला आहे. मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी, चंद्रपूर आणि भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. भंडारा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या करिता जिल्हातील सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालये मधिल विद्यार्थाना आज सुट्टी देण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्याला अतिवृष्टी आणि पुराचा धोका: नागरिकांना सतर्कतेचा इशारा Gadchiroli flood risk and weather warning

भारतीय हवामान विभागाने (IMD) गडचिरोली जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील २४ तासात जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

​याव्यतिरिक्त, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी पुढील २४ तासांसाठी येलो/ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती आणि गोदावरी नद्यांच्या उपखोऱ्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे?

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि गडचिरोली जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

शाळा आणि महाविद्यालये कोणत्या जिल्ह्यांत बंद करण्यात आली आहेत?

चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना हवामानाच्या इशाऱ्यामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्याला कोणता धोका आहे?

गडचिरोली जिल्ह्याला अतिवृष्टीमुळे पूर येण्याचा आणि विजांचा कडकडाट होण्याचा धोका असल्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टीसाठी हवामान विभागाने कोणता इशारा दिला आहे?

उंच लाटा येण्याचा इशारा देण्यात आला असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

Kiara Advani Skin Care: कियारा अडवाणीची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी आईनं १० हजारांना मूल विकलं? नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा आरोप

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

SCROLL FOR NEXT