आपटून आपटून कुणाला मारणार? महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी दुबेंना विचारला जाब, संसदेत राडा

Jai Maharashtra slogans echo in Parliament after Marathi MPs protest: मराठी माणासाला आपटून आपटून मारण्याची भाषा करणाऱ्या निशिकांत दुबेंना राज्यातील महिला खासदारांनी जाब विचारला. महिला खासदारांचा रोष पाहून दुबेंनी काढता पाय घेतला.
NISHIKANT DUBEY
Congress MPs confront BJP’s Nishikant Dubey in Parliament over his 'Marathi people' remark – July 2025.Saam TV News Marathi
Published On
Summary
  • भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या मराठीविरोधी विधानावरून संसदेत राडा

  • काँग्रेसच्या महिला खासदारांनी दुबे यांना संसद लॉबीमध्ये थेट जाब विचारला.

  • "आपटून आपटून कुणाला मारणार?" असा थेट सवाल विचारण्यात आला.

  • "जय महाराष्ट्र"च्या घोषणांनी संसद परिसर दणाणून गेला, दुबे गोंधळून गेले.

मराठी माणसाला आपटून आपटून मारण्याची भाषा करणाऱ्या भाजपच्या निशिकांत दुबे यांना राज्यातील महिला खासदारांनी आपला इंगा दाखवलया. बुधवारी संसदेचे कामकाज संपल्यानंतर लॉबीमध्ये दुबेंना खिंडीत पकड महिला खासदारांनी जाब विचारला. त्यांच्यापुढे जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या. आपटून आपटून कुणाला मारणार? असा सवाल दुबेंना महिला खासदारांनी विचारला. महाराष्ट्राच्या महिला खासदारांचा रोष पाहून दुबेंनी संसदेतून काहीही उत्तर न देता काढता पाय घेतला. दुबेंची झालेली गोची सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

मराठी आणि हिंदीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. त्यातच भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी तेल ओतण्याचे काम करत हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवर नेला. मराठी माणसाला डिवचत वादग्रस्त वक्तव्य केले. राज ठाकरेंनी आपल्या सभेतून दुबेंना इशारा दिलाच होता. आता राज्यातील महिला खासदारांनी खिंडीत पकड मराठमोळा इंगा दाखवला. मराठी खासदारांचा रोष पाहून दुबेंनी काढता पाय घेतला. त्याआधी आप तो मेरी बहन है, असं म्हणत दुबे हात जोडून तिकडून निघून गेले.

NISHIKANT DUBEY
Pune News : पुण्यातील सत्ताधारी आमदाराच्या भावाचा राडा, कलाकेंद्रात अंदाधुंद गोळीबार

काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर यांनी भाजप खासदार दुबे यांना संसेदत गाठलं. दुबेंना तिघींनी घेराव घातला आणि मराठीबाबतच्या विधानांबाबत जाब विचारला. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी दुबे यांना जाब विचारताना म्हटले की, "मराठी लोकांना मारण्याची भाषा तुम्ही कशी करू शकता? आपटून आपटून तुम्ही कुणाला मारणार आहात? ही कसली तुमची अर्वाच्च भाषा ? तुमचे वागणे-बोलणे योग्य नाही. मराठी माणसाबद्दलची आरेरावी खपवून घेतली जाणार नाही. " मराठी खासदारांचा रोष पाहून दुबे गोंधळून गेले अन् संसदेतून काढता पाय काढला. पण ते जाताना महिला खासदारांनी जय महाराष्ट्र अशी घोषणाबाजी केली.

NISHIKANT DUBEY
मराठी असल्यानेच नाना पाटेकरवर कारवाई नाही, मंत्र्यांचाही सपोर्ट, तनुश्रीचे गंभीर आरोप
Q

मराठी माणसाबद्दल वादग्रस्त विधान कोणत्या खासदाराने केलं?

A

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाला "आपटून आपटून मारण्याची" भाषा केली.

Q

दुबेंच्या विधानावर महिला खासदारांनी काय केले?

A

महिला खासदारांनी संसद लॉबीमध्ये दुबे यांना घेरून जाहीरपणे जाब विचारला.

Q

कोणत्या महिला खासदारांनी दुबेंना संसदेत जाब विचारला ?

A

काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, आणि प्रतिभा धानोरकर यांनी दुबेंना खिंडीत पकडलं.

Q

महिला खासदारांनी जाब विचारल्यावर दुबे यांनी काय प्रतिक्रिया दिली?

A

दुबे यांनी कोणताही प्रतिवाद न करता हात जोडून निघून गेले आणि "आप तो मेरी बहन हैं" असं म्हटलं.

Q

निशिकांत दुबे यांनी मराठी भाषिकांबद्दल काय वादग्रस्त विधान केले?

A

दुबे यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील मराठी लोक “आमच्या पैशांवर जगतात” आणि मुंबईत केवळ ३१-३२% मराठीभाषिक आहेत. तसेच, त्यांनी मराठी लोकांकडे उद्योग किंवा खाणी नसल्याचा दावा करत ठाकरे बंधूंना उर्दू, तमिळ भाषिकांना मारण्याचे आव्हान दिले.

Q

निशिकांत दुबे आणि राज ठाकरे यांच्यातील मराठी-हिंदी वादाची सुरुवात कशी झाली?

A

मिरा रोड येथे मराठी न बोलणाऱ्या दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या घटनेनंतर निशिकांत दुबे यांनी “पटक-पटक कर मारेंगे” असे वादग्रस्त विधान केले. यावर राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत दुबेंना मुंबईत येऊन “समुद्रात डुबो-डुबो कर मारेंगे” असे आव्हान दिले, ज्यामुळे हा वाद तीव्र झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com