तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर सातत्याने छळ केल्याचा आरोप केला.
महाराष्ट्रातील मंत्र्यांकडून नानाला संरक्षण मिळत आहे.
अन्नातून विष दिलं गेलं, पाठलाग झाला, आणि पोलिसांनी दुर्लक्ष केलं.
"मराठी असल्यामुळे नानाला सहानुभूती आणि संरक्षण मिळतं", असा रोष व्यक्त केला.
Tanushree Dutta Nana Patekar Controversy News : तनुश्री दत्ताने नाना पाटेकर आणि राज्यातील मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नाना पाटेकरला मंत्र्यांचा सपोर्ट असल्यामुळे कारवाई होत नाही. पोलिसांकडून अभय दिले जातेय. मराठी मराठी म्हणत नाना पाटेकरने सहानुभूती मिळवली आहे. मागील पाच ते सहा वर्षांपासून मला त्रास दिला जातोय. पाठलाग होतोय. जेवणातून विष दिले जातेय, असा गंभीर आरोप नाना पाटेकरवर तनुश्री दत्ताने केला आहे. २००८ मधील हॉर्न ओके चित्रपटावेळी लैंगिक छळ केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर केला होता. आता सात वर्षानंतर तनुश्रीने पुन्हा एकदा नाना पाटेकरवर निशाणा साधला आहे. दरम्यान, तनुश्रीच्या आरोपावर नाना पाटेकरांकडून कोणतीही प्रत्युत्तर अद्याप आलेले नाही.
नाना पाटेकर याचं वागणं अतिशय खराब होतं, त्यामुळे त्याच्यासोबत कुणीही काम करायाला तयार नव्हतं. नाना पाटेकरकडे २००८ मध्ये कोणताही चित्रपट नव्हता. २०१८ नंतर माझ्या अन्नामध्ये-पाण्यामध्येही काहीतरी मिसळलं गेले होते. त्यामुळे मला १८-१८ तास झोप लागायची. माझं डोकेही काम करत नव्हते. मी जीव वाचवण्यासाठी मुंबईहून उज्जेनला गेली. तिथेही माझा पाठलाग करण्यात आला होता. तिथेही माझा अपघात झाला. वारंवार मला त्रास देण्यात आला, असे तनुश्री दत्ताने सांगितले.
२०१८ मध्ये मी पोलिसांकडे गेली होती. गुन्हा दाखल केला. पण पोलसांनी काहीही केले नाही. सात महिन्यानंतर रिपोर्ट क्लोज करण्यात आली. त्यामुळे माझा पोलिसांवरील विश्वासही उडवला. मागील पाच ते सहा वर्षांपासून पाठलाग करण्यात येत आहे. प्रत्येकवेळा वेगवेगळे लोक होते. नाना पाटेकर स्वताने सांगितले होते अभिनेता नसतो तर गुंड असतो. नाना पाटेकर गुंड आहे, असे तनुश्री म्हणाली.
महाराष्ट्राचे प्रशासन, मंत्र्यांचे अशा लोकांसोबत उठणं-बसणं आहे. याच मंत्र्यांसोबत मी नाना पाटेकर यांचे फोटो पाहिले आहेत. मंत्रिमहोदय नाना पाटेकरांसोबत असल्यावर पोलीस काय करणार.. त्यांचे बॉस, मंत्रीच अशा लोकांसोबत फिरत आहेत. पोलिसांनाही आपली वर्दी नाही घालवायची. भ्रष्ट्राचार या लेव्हलपर्यंत आला आहे. एकाद्याची तक्रार आली तर मंत्र्यांसोबत फोटो आहे, पोलीस कशी कारवाई करणार? मंत्र्यांचा पोलिसांचा नाना पाटेकरला सपोर्ट आहे. मराठी असल्यामुळे नाना पाटेकरला सपोर्ट मिळत आहे, असा आरोप तनुश्रीने केला.
मला कोणत्याही सहानभुतीची अपेक्षा नाही. २०१८ मध्ये मी सर्व करून पाहिलं, पण काहीच झालं नाही. कुणाचाही सपोर्ट मिळाला नाही. आता काय मिळणार, असे दत्ता म्हणाली. नाना पाटेकर गँगस्टार कुटुंबातून आला आहे. माझा पाठलाग करण्यासाठी नाना पाटेकर गुंडांना पाठवतोय. पोलिसांपेक्षा मीडियावर माझा जास्त विश्वास आहे. मराठी माणूस म्हणत आत्मा-परमात्मा विकली आहे. मराठी असल्यामुळे नाना पाटेकर खरा असेल, मी बाहेरची असल्यामुळे मीच चुकीची असल्याची समज यांचा झाला आहे, असेही तनुश्री दत्ताने म्हटले आहे.
तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांनी कोणत्या चित्रपटात एकत्र काम केले?
तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांनी 2008 मध्ये 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटात एकत्र काम केले.
तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर कोणते आरोप केले?
तनुश्रीने आरोप केला की 'हॉर्न ओके प्लीज' च्या सेटवर एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी तिच्याशी गैरवर्तन केले, तिला गैरप्रकारे स्पर्श केला आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
तनुश्रीच्या आरोपांनंतर नाना पाटेकर यांची प्रतिक्रिया काय होती?
नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे आरोप खोटे असल्याचे सांगितले आणि ते कोर्टात तिच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करतील असे जाहीर केले. त्यांनी सेटवर अनेक लोक उपस्थित असल्याचे नमूद करत आरोप फेटाळले.
नाना पाटेकर-तनुश्री दत्ता या प्रकरणाचा कायदेशीर निकाल काय झाला?
2019 मध्ये मुंबई पोलिसांनी पुराव्याअभावी 'बी-समरी' अहवाल सादर केला, ज्यामुळे नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळाली. तनुश्रीने याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली, पण 2025 मध्ये कोर्टाने तक्रार कालमर्यादेपलीकडील असल्याने रद्द केली.
तनुश्रीच्या आरोपांचा बॉलिवूडवरील परिणाम काय झाला?
तनुश्रीच्या आरोपांमुळे 2018 मध्ये भारतात #MeToo चळवळीला चालना मिळाली, ज्यामुळे अनेक सेलिब्रिटींनी आपल्या अनुभवांचा खुलासा केला आणि बॉलिवूडमधील गैरवर्तनाच्या समस्येवर प्रकाश पडला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.