Pune News : पुण्यातील सत्ताधारी आमदाराच्या भावाचा राडा, कलाकेंद्रात अंदाधुंद गोळीबार

Pune’s Daund kalakendra : पुण्यातील दौंडमध्ये एका कलाकेंद्रात सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. या घटनेत एकजण जखमी झाला असून रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Saam TV Breaking News
Saam TV Breaking NewsSaam TV Breaking News
Published On
Summary
  • दौंडमधील कलाकेंद्रात आमदाराच्या भावाने केलेल्या कथित गोळीबाराने खळबळ उडवली.

  • एक तरूणी गंभीर जखमी झाला असून, पोलीस अजून कारवाई करत नसल्याचे आरोप.

  • रोहित पवार यांनी ट्विट करून पोलिसांवर व सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.

  • सोशल मीडियावर सत्ताधारी आमदार कोण? याची चर्चा आणि सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.

Rohit Pawar alleges political interference in Daund firing case : पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दौंडमध्ये एका कलाकेंद्रात सत्ताधारी आमदाराच्या भावाने राडा घातला आहे. त्या व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला आहे. यामध्ये एका तरूणी गंभीर जखमी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी पोलिसांच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दरम्यान, सत्ताधारी आमदाराच्या भावाने नेमका राडा का घातला? याचं कारण काय होतं? पोलिसांनी काही कारवाई केली का? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पुण्यातील दौडमध्ये कलाकेंद्रात पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार करत राडा घातल्याचा आरोप रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केला आहे. या गोळीबारात एकजण झखमी झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करत पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अंदाधुंद गोळीबार करणारे हे कोण महाशय आहेत, हे शोधण्याऐवजी पोलीस यंत्रणा सत्ताधारी दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे, असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Saam TV Breaking News
महायुतीच्या महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, भाजपला सर्वाधिक जागा?

रोहित पवार यांनी सत्ताधारी आणि पोलिसांवर गंभीर आरोप करतानाच काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कलाकेंद्रातील राड्यामधील दोषींवर कारवाई होणार आहे की नाही? सत्ताधारी आहेत म्हणून मोकाट सोडणार? हा कसला ‘सत्तेचा तमाशा?’ कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदा व सुव्यवस्थेत अनंत कटकटी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, असे रोहित पवार यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटले आहे. रोहित पवार यांच्या आरोपानंतर सत्ताधारी आमदार कोण? याचे तर्कवितर्क सोशल मीडयावर लावले जात आहेत. रोहित पवारांच्या आरोपानंतर सरकार आणि पोलिसांकडून काय कारवाई केली जातेय? याबाबत नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

Saam TV Breaking News
Kalyan : हप्ते वसुली, दरोडा अन् मारहाण; मराठी तरुणीला मारणाऱ्या परप्रांतीय गोकुळचा कच्चाचिठ्ठा उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com