Kalyan : हप्ते वसुली, दरोडा अन् मारहाण; मराठी तरुणीला मारणाऱ्या परप्रांतीय गोकुळचा कच्चाचिठ्ठा उघड

Kalyan Hospital Rada gokul jha News : गोकुळ झाचा गुन्हेगारी इतिहास उघड, मराठी तरुणीवर हल्ला करणाऱ्याला मनसेने पकडले अन् पोलिसांच्या स्वाधीन केले.
Gokul Jha
Who is Gokul Jha? Full criminal record and arrest detailsSaam TV News Marathi
Published On
Summary
  • गोकुळ झा याने मराठी तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

  • मनसे कार्यकर्त्यांनी गोकुळ झा याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं.

  • गोकुळवर कल्याण, कोळशेवाडी, उल्हासनगरमध्ये गुन्हे दाखल आहेत.

  • चार दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आलेल्या गोकुळवर पुन्हा गंभीर गुन्हा दाखल.

Kalyan Hospital Marathi Receptionist Case : कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करणाऱ्या परप्रांतीय गोकुळ झा याला बेड्या ठोकण्यात आल्या. मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय गोकुळ झा याला शेतातून पकडले अन् बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले. महाराष्ट्रात राहून मराठी मुलीला मारणारा गोकुळ झा आहे तरी कोण? त्याची इतकी हिम्मंत कशी झाली? नराधम गोकुळ झाला याचा सगळा कच्चाचिठ्ठा उघड झाला आहे.  ( Who is Gokul Jha? Full criminal record and arrest details)

मराठमोळ्या तरूणीला मारहाण झाल्याची माहिती मिळताच मनसे आक्रमक झाले. अविनाश जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना गोकुळ झा याला शोधण्याचे आदेश दिले अन् मनसेची शोधमोहीम सुरू झाली. पोलिसांच्या आधी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ झाला याला पकडले. योगेश गव्हाणे यांनी गोकुळ झा याला शेतातून पकडले अन् पोलिसांच्या स्वाधीन केले. मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

Gokul Jha
Pune : लग्नानंतर चारित्र्यावर संशय, क्लास वन अधिकाऱ्याने काढले पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ

कोण आहे गोकुळ झा?

परप्रांतीय गोकुळ झा हा कुख्यात गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. गोकुळवर कल्याण, कोळशेवाडी आणि उल्हासनगर परिसरात दरोडे तसेच मारहाणीचे अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत. कल्याण पूर्वेतील नांदिवली भागात तो फेरीवाल्यांकडून जबरदस्तीने हप्ते गोळा करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. गोकुळ झाला कठोर शिक्षा होण्यासाठी त्याची सखोल चौकशी केली जात आहे.

Gokul Jha
DA Hike : रक्षाबंधनाआधी गुड न्यूज, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढण्याची शक्यता

४ दिवसापूर्वीच तुरूंगातून बाहेर -

गोकुळ झा हा चार दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. त्याच्यावर यापूर्वी दोन गंभीर गुन्हे नोंदले गेले आहेत. एक हत्यार बाळगणे आणि दुसरा मारहाणीचा गुन्हा त्याच्यावर नोंदवला गेला आहे. विठ्ठलवाडी आणि कोळशेवाडी पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात त्याने हत्याराने मारहाण केली होती, तर दुसऱ्या प्रकरणात त्याने ट्रक चालकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. कोळशेवाडी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाच्या मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, ज्यात गोकुळला अटक झाली होती. मराठी मुलीला मारहाण केलेल्या प्रकरणात पोलिसांनी एकूण चार जणांना ताब्यात घेतले आहे. गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा यांचा समावेश आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. आता पोलिस न्यायालयात कोणती माहिती सादर करतात आणि न्यायालयाचा निर्णय काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gokul Jha
...तर राजीनामा द्यायला तयार, व्हायरल व्हिडिओवरून माणिकराव कोकाटे स्पष्टच बोलले
Q

गोकुळ झा कोण आहे?

A

गोकुळ झा हा परप्रांतीय असून तो कल्याण परिसरातील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर दरोडे, हत्यार बाळगणे आणि मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

Q

गोकुळ झा याला अटक का? प्रकरण काय घडलं?

A

गोकुळ झा याने खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला बेदम मारहाण केली.

Q

पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

A

मनसे कार्यकर्त्यांनी गोकुळ झा याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं असून, पोलिसांनी त्याच्यासह इतर तिघांनाही ताब्यात घेतले आहे.

Q

गोकुळ झावर पूर्वीही गुन्हे होते का?

A

हो, त्याच्यावर कोळशेवाडी व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे नोंदवले गेले आहेत. तो चार दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर सुटलेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com