अकोल्यात पळसो बढे येथे साप चावल्याने १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू.
रात्री झोपेत असताना मन्यार सापाने दंश केला.
उपचारादरम्यान मृत्यू; गावात हळहळ व भीतीचं वातावरण.
आरोग्य विभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी
Akola Latest News : अकोल्यातल्या पळसो बढे गावात सर्पदंश झाल्याने 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. घरात गाढ झोपेत असताना तरुणीला सापाने दंश केला. रुपाली गोवर्धन खांडेकर असं या मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. विषारी सापाने दंश घेतल्याने ही दुर्घटना घडली. उपचारादरम्यान रुपालीचा मृत्यू झाला. रुपाली घरातील खोलीत गाढ झोपेत असताना तिच्या हाताच्या बोटाला काहीतरी चावल्याची तीव्र जाणीव झाली. मन्यार या विषारी सापाने तिला दंश केल्यामुळे रूपालीने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अकोल्यातील पळसो बढे येथे गोवर्धन खांडेकर यांचं कुटुंबं राहत. गोवर्धन खांडेकर यांची मुलगी रुपाली रात्रीच्या सुमारास हाताच्या बोटावर झोपेत काहितरी चावलं असावेत, अशी गाढ झोपेत असताना जाणीव झाली. ती झोपेतून जागे होताच तिच्या निदर्शनास साप दिसून आला. त्यामुळे घरातील सर्व खळबळजनक जागे झाले. आणि कुटुंबीयांच्या सर्वांच्या मनात भीती बसली. तात्काळ उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले.
दरम्यान रुपाली हिला विषारी मन्यार जातीचा सापाने दंश केल्याने तिची प्रकृती खालवत गेली, अर्थातच चिंताजनक झाली. अखेर उपचारादरम्यान रुपालीची प्राणज्योत मावळली. मृत रुपाली सुसंस्कृत व सुस्वभावी होती. या घटनेनंतर पळसो बढे गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, सर्पदंशच्या घटनेनंतर गावात भीतीचं वातावरण आहे. पावसाळ्याच्या काळात सर्पदंश घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी सतर्कता ठेवावी, असं आवाहन आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने केले.
मन्यार साप कोणत्या प्रकारचा साप आहे आणि तो कोठे आढळतो?
मन्यार साप (Common krait) हा विषारी साप आहे. तो भारत, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान आणि दक्षिण-पूर्व आशियातील इतर भागांत आढळतो. हा साप शेतजमिनी, जंगले आणि गवताळ प्रदेशात राहतो.
मन्यार सापाची ओळख कशी करावी?
मन्यार सापाचा रंग काळा किंवा तपकिरी असतो. त्यावर गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचे ठिपके किंवा डाग असतात. त्याचे डोके त्रिकोणी आकाराचे असते, जे विषारी सापाचे लक्षण आहे, आणि शरीर जाड, लांब असते, साधारण 3-5 फूट लांबीपर्यंत.
मन्यार सापाच्या दंशाचे परिणाम काय असतात?
मन्यार सापाचे विष हिमोटॉक्सिक आहे. रक्तवाहिन्या आणि ऊतींना नुकसान पोहोचवते. दंशामुळे तीव्र वेदना, सूज, रक्तस्त्राव, आणि अवयव निकामी होण्याचा धोका असतो. त्वरित वैद्यकीय उपचार न मिळाल्यास मृत्यू होऊ शकतो.
मन्यार सापाचा दंश झाल्यास प्रथमोपचार काय करावे?
दंश झाल्यास शांत राहावे, जखम स्वच्छ पाण्याने धुवावी, बाधित अवयव स्थिर ठेवावा आणि तातडीने जवळच्या रुग्णालयात जावे. जखमेवर बांध बांधू नये किंवा विष चोखण्याचा प्रयत्न करू नये. अँटी-व्हेनम हा एकमेव प्रभावी उपचार आहे.
मन्यार साप पर्यावरणात कोणती भूमिका बजावतो?
मन्यार साप पर्यावरणातील जैविक संतुलन राखण्यास मदत करतो. तो उंदीर आणि इतर लहान प्राण्यांना खातो. त्यामुळे शेतीतील पिकांचे नुकसान कमी होते. तसेच, तो खाद्य साखळीतील महत्त्वाचा दुवा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.