कोल्हापूरमध्ये आईचा हृदयविकाराने मृत्यू; बाळाला दूध पाजताना घटना घडली.
२७ वर्षीय रचना चौगुले या आशा वर्कर होत्या.
अचानक मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
Mother dies while breastfeeding : २० दिवसांच्या नवजात बाळाला दूध पाजतानाच मातेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापूरमध्ये घडली. कोल्हापूरच्या संभाजीनगरातील जुनी मोरे कॉलनीत २७ वर्षीय रचना चौगुले यांचा हॉर्ट अटॅकने मृत्यू झाला. रचना २० दिवसांच्या बाळाला दूध पाजत होती, त्यावेळी हॉर्ट अटॅक आला अन् दुर्दैवी घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रचना चौगले यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर आणि परिसरावर शोककळा पसरली आहे. रचना आणि तिचे पती स्वप्नील यांचा २०१८ मध्ये विवाह झाला होता. स्वप्नील खासगी कंपनीत नोकरी करतात. या दांपत्याला सात वर्षांची मुलगी स्वरा आणि नुकतीच जन्मलेली 20 दिवसांची पियुषा यांनी घर आनंदाने भरले होते. 2 जुलै 2025 रोजी रचनाने पियुषाला जन्म दिला. बाळ आणि आई दोघेही निरोगी होते. काही दिवसांपूर्वीच पियुषाच्या बारशाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. बुधवारी पहाटे पियुषा रडू लागल्याने रचनाने तिला दूध पाजले. बाळ पुन्हा झोपले, परंतु काही वेळाने ती पुन्हा रडू लागली. यावेळी रचनाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. तिच्या सासूने हाक मारली, तरी ती उठली नाही. स्वप्नीलने तिला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती बेशुद्ध असल्याचे आढळले.
तातडीने रचनाला सावित्रीबाई फुले रुग्णालयात आणि नंतर सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. रचनाच्या अचानक जाण्याने तिचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. स्वप्नील, त्यांच्या दोन मुली, सासू-सासरे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेषतः 20 दिवसांच्या पियुषा आणि सात वर्षांच्या स्वराने आपली आई कायमची गमावली. रचना ही आशा वर्कर म्हणून कार्यरत होती आणि तिच्या सौम्य स्वभावाने, सेवाभावी वृत्तीने परिसरातील लोकांच्या मनात स्थान मिळवले होते. तिच्या निधनाने कुटुंबासह संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.