Hotel Bhagyashree : हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचे अपहरण, चौघांनी गाडीत कोंबलं, बेदम मारलं अन् फेकून दिलं, व्हिडिओ

who is hotel bhagyashree owner Nagesh Madke : धाराशिवमधील भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांचे अपहरण करून चार जणांनी बेदम मारहाण केली. ५ किमीवर फेकून दिल्याने ते गंभीर जखमी झाले.
Hotel Bhagyashree Owner Nagesh Madke
Hotel Bhagyashree owner Nagesh Madke assaulted and dumped by unknown attackers after kidnapping near Dharashiv.Saam TV News Marathi
Published On
Summary
  • हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचे अपहरण आणि मारहाण

  • चार जणांनी सेल्फीच्या बहाण्याने गाडीत बसवले आणि मारहाण केली

  • पाच किमीवर वडगाव येथील पुलाजवळ फेकून दिले

  • सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून गुन्हा लवकरच दाखल होणार

Hotel Bhagyashree Owner Nagesh Madke Kidnapped and Assaulted, Thrown from Moving Car :सोशल मिडियावर धुमाकुळ घालणाऱ्या महाराष्ट्रतील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्री मालकाचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. चार जणांनी हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचे अपहरण केले. त्यांना चालत्या गाडीत बेदम मारहाण करून त्यांना हॉटेल पासून दूर 5 किमीवर फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यामध्ये मडके गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. हाताला, पायाला अन् मानेला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरू आहे. बुधवारी सायंकाळी पाच ते सात वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सध्या हॉटेल मालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सेल्फी काढण्यासाठी मला बोलवलं अन् गाडीत ओढलं. चार जणांनी मला बेदम मारहाण केली. हॉटेलपासून पाच किमीवर मला टाकलं अन् ते पळाले असे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी सांगितले. दरम्यान, मडके यांना काही दिवसांपूर्वी मारण्याची धमकी आली होती, त्याचे ऑडिओ व्हायरल झाले होते.

Hotel Bhagyashree Owner Nagesh Madke
आपटून आपटून कुणाला मारणार? महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी दुबेंना विचारला जाब, संसदेत राडा

तुझे दिवस भरले, तू व्हिडिओ टाकू नकोस असे म्हणत तुळजापुरच्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला अज्ञात व्यक्तीने फोन करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. तुला जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. चार पाच दिवसांत गेम करू, अशी धमकी फोनवर मिळाली होती. हॉटेल चालवून आपल्या मुलीच्या वाढदिवसाला चक्क फॉच्युनर एसयुव्ही गाडी भेट दिल्यानंतर भाग्यश्री हॉटेल राज्यभर चर्चेत आले होते.

Hotel Bhagyashree Owner Nagesh Madke
Pune : दौंडमध्ये कला केंद्रात अंदाधुंद गोळीबार, सत्ताधारी आमदाराच्या भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

हॉटेल मालकाचा काय आरोप ?

धाराशिव येथील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्यावर बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नागेश मडके हॉटेलसमोर उभे असताना एका चारचाकी गाडीतून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी सेल्फीच्या बहाण्याने त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवले. गाडीत चार ते पाच जणांनी त्यांना मारहाण केली आणि गाडी धाराशिवच्या दिशेने नेली. मडके यांचा आरोप आहे की, हल्लेखोरांनी त्यांना जीवे मारण्याचा कट रचला होता. त्यांना वडगाव (सि.) येथील पुलावर फेकून देण्यात आले. घटनेनंतर मडके यांनी कुटुंबीयांना माहिती दिली आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. अद्याप गुन्हा दाखल झाला नसून, लवकरच पोलिसांत तक्रार देणार असल्याचे मडके यांनी सांगितले.

Hotel Bhagyashree Owner Nagesh Madke
Pune News : पुण्यातील सत्ताधारी आमदाराच्या भावाचा राडा, कलाकेंद्रात अंदाधुंद गोळीबार

धाराशिवमधील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्री संदर्भात तुमच्या प्रश्नांची उत्तरे

Q

तुळजापूरमधील हॉटेल भाग्यश्री कशासाठी प्रसिद्ध आहे?

A

हॉटेल भाग्यश्री हे धाराशिवमधील उस्मानाबादी शेळीच्या चविष्ट मटण थाळीसाठी प्रसिद्ध आहे, विशेषतः ₹250 मध्ये अनलिमिटेड मटण थाळीमुळे.

Q

हॉटेल भाग्यश्रीचे मालक कोण आहेत? hotel bhagyashree owner name

A

हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके आहेत, जे त्यांच्या “नाद करतो का, यायलाच लागतंय” या डायलॉगमुळेही प्रसिद्ध झाले.

Q

हॉटेल भाग्यश्रीच्या लोकप्रियतेचे कारण काय आहे?

A

उस्मानाबादी शेळीच्या चविष्ट मटणामुळे आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमुळे हॉटेलला मोठी गर्दी होते.

Q

हॉटेल भाग्यश्रीशी संबंधित कोणती घटना नुकतीच घडली?

A

23 जुलै 2025 रोजी सायंकाळी हॉटेल मालक नागेश मडके यांचे 4-5 अज्ञात व्यक्तींनी अपहरण करून मारहाण केली, ज्यामुळे खळबळ उडाली.

Q

हॉटेल भाग्यश्रीच्या व्यवसायात कोणती खास वैशिष्ट्ये आहेत?

A

हॉटेल दररोज 10-20 बोकड कापते आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाऊन्सर ठेवले आहेत; तसेच येथे गाड्यांच्या 2 किमी लांब रांगा लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com