केडीएमसीचे तिघे अधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले
सेवेत पुन्हा घेण्यासाठी २५ हजार, परवानगीसाठी ४० हजार रूपयांची लाच
वसंत देवळूरकर, सुदर्शन जाधव आणि रवींद्र आहिरे यांना अटक
आतापर्यंत ४७ अधिकारी-कर्मचारी लाचखोरीत अडकले
अभिजित देशमुख, कल्याण प्रतिनिधी
Thane ACB traps KDMC officials for accepting ₹25,000 and ₹40,000 bribes : एका दिवसात केडीएमसीच्या तीन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पडकण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाने आज ही कारवाई केली. आजारी कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी २५ हजार, तर बांधकाम परवानगीसाठी ४० हजारांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. आतापर्यंत ४७ केडीएमसी अधिकारी व कर्मचारी लाचखोरी प्रकरणात अडकल्याने महापालिकेतील भ्रष्टाचार उघड झाला आहे.
ठाणे लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील (KDMC) भ्रष्टाचारावर ठाणे लाचलुचपत विभागाने मोठा घाव घातला आहे. एकाच दिवशी केडीएमसीचे तिघे अधिकारी लाच घेताना रंगेहात अटकेत आले आहेत. ही कारवाई केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि बांधकाम विभागात झाली आहे वसंत देवळूरकर (घनकचरा विभाग) ,सुदर्शन जाधव (घनकचरा विभाग),रवींद्र आहिरे (सहाय्यक अभियंता, बांधकाम विभाग) असे या तिन्ही अधिकाऱ्यांची नावे आहेत.
घनकचरा विभागातील वसंत देवळूरकर आणि सुदर्शन जाधव यांनी आजारी कर्मचाऱ्याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील २० हजार रुपये स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली. दुसरीकडे, सहाय्यक अभियंता रवींद्र आहिरे याने बांधकाम परवानगी देण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाकडून ४० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडला गेला.केडीएमसीच्या इतिहासात आतापर्यंत ४७ अधिकारी व कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. ही आकडेवारी महापालिकेतील वाढत्या भ्रष्टाचाराची गंभीरता दाखवते.
केडीएमसीमधील कोणते अधिकारी अटकेत आले?
वसंत देवळूरकर, सुदर्शन जाधव (घनकचरा विभाग) आणि रवींद्र आहिरे (सहाय्यक अभियंता, बांधकाम विभाग)
लाच किती रक्कमेची होती?
२५,००० (सेवेतील पुनर्नियुक्तीसाठी) आणि ४०,००० (बांधकाम परवानगीसाठी)
ही कारवाई कुठल्या विभागाने केली?
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने
आतापर्यंत किती अधिकारी लाचखोरीत सापडले?
४७ अधिकारी आणि कर्मचारी केडीएमसीमधून अडकले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.