Heat Wave
Heat Wave saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Heat Wave: महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा; ठाणे, साेलापूर, नांदेडकर उकाड्याने हैराण

विश्वभूषण लिमये, विकास काटे

- संजय सुर्यवंशी

Heat Wave In Maharashtra : राज्यातील मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ हाेऊ लागली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात नागरिकांना उन्हाची झळ बसू लागली आहे. राज्यातील ठाणे (thane), साेलापूर (solapur), सातारा (satara), वर्धा (wardha), पुणे (pune), जळगाव (jalgoan) आदी जिल्ह्यात पारा 40 पेक्षा अधिक असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. (Breaking Marathi News)

सोलापूर शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. काल सोलापूरचे तापमान ४१.३ आणि किमान तापमान २३.४ अंशावर पोहोचले. यामुळे घामेघूम झालेल्या लोकांना उकाड्याचा भलताच त्रास सहन करावा लागत आहे. कधी पावसाचा अंदाज तर कधी हवेत गारवा अशा विविध पद्धतीने बदलत चाललेल्या हवामानामुळे सोलापूरकर चांगलेच वैतागले आहेत.

सकाळी सात वाजल्यापासून उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. सकाळच्या सत्रात अंगाला चटके देणारं उन्ह असतं,दुपारी उकाडा जाणवतो तर रात्रीच्या सुमारास घामानं सोलापूरकरांचे अंग चिंब होतं असं चित्रविचित्र वातावरण सध्या सर्वत्र दिसून येत आहे.

काही दिवसापूर्वी शहरासोबतच जिल्ह्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली. त्यात शेतीपिकांचे नुकसान झाले. अशातच कधी कधी कडक उन्हात अचानक ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने तिहेरी हवामानाचा अनुभव सोलापूरकर घेत आहेत.

सोलापूरच्या तापमानात वाढ होत असताना एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सोलापूरचे तापमान ४५ अंशावर पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मार्च महिन्यात सोलापूरचे तापमान ३७ अंशापर्यंत होते. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ४० अंशापर्यंत तापमान पोहोचले होते.

आता एप्रिलच्या दुसया आठवड्यात तापमानाचा पारा ४१ अंशाच्या पुढे गेला आहे. वाढत्या उन्हामुळे घरातील पंखा,एसी,कूलर,फ्रिज आणि अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्यांचा वापर वाढल्याने विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांच्या बिलात ५०० ते १००० रुपयांची वाढ झाली आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या सुमारास रस्त्यावरही वर्दळ कमी दिसून येत आहे.

ठाण्यात उकाड्याने नागरिक हैराण

वाढत्या तापमानाचा फटका ठाणेकर नागरिकांना बसू शकतो अज देखिल ठाण्याचा पारा ४१ टक्के आहे काल देखिल ४३ टक्के इतका पारा होता. त्यामुळे ठाणेकर नागरिकांना मे महिन्यात पारा वाढण्याची शक्यता आहे.

नांदेडला कुलर खरेदीस गर्दी

नांदेडला उन्हाच्या झळांनी नागरिक सध्या हैराण झाले आहेत. या उन्हाच्या झळां पासून वाचण्यासाठी नागरिक कुलर खरेदीकडे वळले आहेत. नांदेड शहरातील आनंद नगर रस्त्यावर कुलर बनवणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत.

परंतु कुलर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात तीस टक्क्यांनी वाढ झाल्याने कुलरची थंड हवा महाग झालीय. दीड हजार ते पाच हजरांपर्यंत कुलर बाजारपेठेत उपब्धत आहेत. कुलरच्या किंमतीत कुठलेही वाढ करण्यात आली नाही. पण कुलर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यात मात्र तीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उजनी धरणातून 10 मे रोजी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार

Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक; नागपुरातील निवास्थानाबाहेर निदर्शने

Mumbai News: नोकरीसाठी मराठी माणूस नको,पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कंपनीने मागितली माफी; काय आहे प्रकरण

Dia Mirza : हँसता हुआ नूरानी चेहरा; काली ज़ुल्फ़ें रंग सुनहरा...

SCROLL FOR NEXT