- जितेश कोळी
Ratnagiri News : खेड तालुका पंचायत समितीमध्ये आज (बुधवार) जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अधिकारी व ठेकेदार यांची बैठक सुरु असताना ठाकरे गटाच्या नेत्यांना व्यासपीठावर बसवल्याने शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी भर बैठकीत गोंधळ घातला. यावेळी काही काळासाठी वातावरण तणावपूर्ण बनले होते. (Maharashtra News)
शिंदे गटाचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांनी आपल्या सहकारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पंचायत समिती येथे आले होते. त्यावेळी अधिकारी व ठेकेदार यांच्या बैठकीला एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नसेल असे सांगणा-या अधिकारी यांनी ठाकरे गटातील माजी आमदार संजय कदम (former mla sanay kadam) व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना व्यासपीठावर बसवून बैठक सुरु केल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे शिंदे गटाचे तालुकाप्रमुख सचिन धाडवे हे आक्रमक झाले. त्यांनी बैठकीतील अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. त्याचवेळी माजी आमदार संजय कदम यांनी हस्तक्षेप केल्याने दाेन्ही गटाकडून वादावादी सुरु झाली.
परिणामी ठाकरे व शिंदे गटात बैठकीतच जोरदार शाब्दिक चकमक उडाली. हा गोंधळ हमरीतुमरी वर आला. माजी आमदार संजय कदम हे अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावून बैठकीतून निघून गेले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.