Government Employee Called Strike For Old Pension Scheme After Chief Minister Eknath Shinde Meeting Saam Tv
महाराष्ट्र

Government Employee Strike: राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम, सर्वसामान्य नागरिकांना बसणार फटका

Protest For Old Pension Scheme: आजच्या बैठकीत सरकारने १० नोव्हेंबर २००५ च्या पूर्वीचा सरसकट पेन्शनचा प्रस्ताव दिला आहे. मात्र तो मंजूर नसल्याने उद्या संपावर जाणार आहेत. सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्यास सकारात्मक असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

Bharat Jadhav

(सुरज सावंत)

Government Employee Strike For Old Pension Scheme:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शासकीय कर्मचाऱ्यांची केलेली मनधरणी अपयशी ठरलीय. सरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. शासकीय कर्मचारी हे उद्या सरकारी कर्मचारी संपावर जाणार आहेत. विधानसभेत सरकारने निवेदन केल्यानंतरच संघाबाबत निर्णय होणार आहेत. (Latest News)

आज मुख्यमंत्री (Chief Minister)आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु कर्मचारी आपल्या निर्णयावर ठाम आहेत. आजच्या बैठकीत सरकारने १० नोव्हेंबर २००५ च्या पूर्वीचा सरसकट पेन्शन च प्रस्ताव दिला आहे. मात्र तो मंजूर नसल्याने उद्या संपावर जाणार आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या (Government Employees) संपाचा फटका सामन्य नागरिकांना बसणार आहे.

आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी कर्मचाऱ्यांना ग्वाही दिली की, सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्यास सकारात्मक आहे. शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत. आपले आर्थिक आणि सामाजिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. मागेच्या वेळी जे आश्वसन दिले आजही माझे तेच शब्द आहेत. गेल्यावेळी आपण सहकार्य केले, तसेच आताही करा. संपाची हाक न देता सहकार्याची भूमिका घेण्याची गरज होती, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT