Range Rover Electric चा टीझर लॉन्च, 2024 मध्ये करता येईल खरेदी? पाहा VIDEO

Range Rover Electric SUV Teaser: रेंज रोव्हरने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारच्या प्रोटोटाइपचा अधिकृत टीझर रिलीज केला आहे. ही एक मोठ्या आकाराची एसयूव्ही कार असेल. ज्यामध्ये अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्स असेल.
Range Rover Electric SUV Teaser Launched
Range Rover Electric SUV Teaser LaunchedSaam Tv
Published On

Range Rover Electric SUV Details:

रेंज रोव्हरने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारच्या प्रोटोटाइपचा अधिकृत टीझर रिलीज केला आहे. ही एक मोठ्या आकाराची एसयूव्ही कार असेल. ज्यामध्ये अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्स आणि इंटीरियर असेल.

टीझरनुसार, या कारची वॉटर वेडिंग क्षमता 850 मिमी असेल. वाळू आणि खडबडीत रस्त्यांवर कार हाय परफॉर्मन्स देईल. 2024 च्या मध्यापर्यंत ही कार लॉन्च होईल, असा अंदाज आहे. सध्या कंपनीने या कारची किंमत, पॉवरट्रेन आणि लॉन्च डेट याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Range Rover Electric SUV Teaser Launched
Royal Enfield Shotgun 650: बाजारात धिंगाणा! आली नवीन रॉयल एनफील्ड शॉटगन 650; जाणून घ्या किंमत

या करशी होणार स्पर्धा

रिलीज झालेल्या टीझरमध्ये, याचे मोठे टायर दिसत आहेत, ज्याच्या चाकांवर EV बॅजिंग उपलब्ध असेल. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार फ्लेक्सिबल मॉड्युलर लॉजिट्यूनल आर्टिकल प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आली आहे. यामुळे ती पाणी, वाळू, पर्वत इत्यादी सर्वत्र धावण्यास सक्षम आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ही कार बाजारात BMW iX, Audi Q8 e-Tron आणि Mercedes-Benz EQS SUV ला टक्कर देईल. या कारच्या पुढील भागात चार्जिंग पॉइंट असेल, अशी अपेक्षा आहे. कारला अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर मिळतील. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या रेंज रोव्हर कारमध्ये 4.4 लिटरचे ट्विन टर्बो इंजिन आहे. हे इंजिन 615 PS ची हाय पॉवर आणि 750 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

Range Rover Electric SUV Teaser Launched
Kinetic Green Zulu इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, 104 km ची रेंज, फ्युचरिस्टिक लूक; जाणून घ्या किंमत

यामध्ये पाच आणि सात सीटचे दोन्ही पर्याय मिळू शकतात. या हाय क्लास लक्झरी कारला 107.8 kWh चा बॅटरी पॅक मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये सिंगल आणि ड्युअल मोटर असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार एका चार्जवर 613 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल.

कारची सिंगल मोटर 360 पीएस पॉवर आणि 568 एनएम टॉर्क जनरेट करेल. यात ऑल व्हील पॉवरट्रेन मिळेल. या एलिट लूक कारमध्ये 12.3 इंच डिजिटल डिस्प्लेसह मल्टी झोन ​​क्लायमेट कंट्रोलची सुविधा असेल. कारमध्ये सहा एअरबॅग्ज आणि पार्किंग असिस्टची सुविधाही असण्याची शक्यता आहे.

Range Rover Electric SUV Teaser Launched
Bhel Puri Recipe: चटपटीत भेळपूरी घरच्याघरी कशी बनवायची?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com