Old Pension scheme: मोठी बातमी! राज्य सरकार जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक, विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार?

Old Pension scheme demand in Maharashtra: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत.
Old Pension scheme News
Old Pension scheme News Saam tv
Published On

Old Pension scheme News:

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारने तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती. त्यानंतर आता या समितीने हा अहवाल सादर केला आहे. याचदरम्यान, अर्थमंत्री अजित पवारांनी जुन्या पेन्शन योजनेवर मोठं विधान केलं आहे. (Latest Marathi News)

राज्य सरकराने जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. 'जुन्या पेन्शनसंदर्भात राज्य सकारात्मक असून विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधान परिषदेत दिले.

Old Pension scheme News
Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजनेवरून आरबीआयचा राज्य सरकारांना इशारा; काय आहे कारण?

विधान परिषदेत बोलताना अजित पवार काय म्हणाले?

विधान परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, 'जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात केंद्र सरकारच्या स्तरावर वेगळा विचार सुरु आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतन, महागाई भत्ता यात केंद्र सरकारनं वाढ केली आहे. त्यानुसार, राज्य सरकार देखील त्याच पद्धतीने वाढ करत असते. जुन्या पेन्शन योजनेबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतल्यास त्याच धर्तीवर राज्य सरकार निर्णय घेईल'.

Old Pension scheme News
OBC Mahamelava: आता नांदेडमध्ये ओबीसी महामेळावा; छगन भुजबळांची तोफ धडाडणार, जरांगे-पाटील यांच्या सभांना देणार उत्तर

'जुन्या पेन्शन योजनेबाबत सुबोधकुमार, के. पी. बक्षी आणि सुधीर श्रीवास्तव या तिघांच्या समितीने अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. देशातील काही राज्यात जुन्या पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यात आला आहे, त्याची माहिती मागविण्यात आली आहे. त्यावर अभ्यास करण्यात येईल. जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात दिले.

Old Pension scheme News
Explainer : मुख्यमंत्री निवडीचा PM मोदी-अमित शहा यांचा फॉर्म्युला काय? भाजपच्या CM निवडीच्या बैठकीत नेमकी काय होते चर्चा?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com