Maratha Aarkshan: केंद्र सरकारने मराठा आरक्षण टक्का वाढवून द्यावा; मराठा महासंघाची भूमिका

Ahmednagar News : मराठा आरक्षण सध्या संवेदनशील विषय असून मनोज जरांगे पाटील यांच्या मागे सध्या संपूर्ण मराठा समाज उभा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
Maratha Aarkshan
Maratha AarkshanSaam tv
Published On

सुशील थोरात

अहमदनगर : मराठा समाजासह देशातील इतर राहिलेल्या समाजासाठी ५० टक्के आरक्षण कोटा वाढवावा आणि वेगळ्या प्रवर्गातून सर्वांना (Maratha Aarkshan) आरक्षण द्यावे; अशी भूमिका मराठा महासंघाची (Ahmednagar) असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांनी मांडली. (Tajya Batmya)

Maratha Aarkshan
BJP NCP Controversy : राष्ट्रवादी अजित पवार गट व सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये वाद; रुग्णालयाच्या उद्घाटन फलकावरील नावावरून नाराजी

मराठा आरक्षण सध्या संवेदनशील विषय असून मनोज जरांगे पाटील यांच्या मागे सध्या संपूर्ण मराठा समाज उभा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच ओबीसी समाजाचे मेळावे सुद्धा सध्या राज्यात सुरु असून या ओबीसी मेळाव्यातून राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे वाचाळवीरासारखे बोलत असून ४० वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर आणि हजारो कोटी रुपयांची संपत्ती गोळा केल्यानंतर त्यांनी समाधानी असायला पाहिजे. मात्र तसे न करता भुजबळ सारखे मराठ्यांवर तुटून पडले आहेत; असेही जगताप यांनी सांगितले.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Aarkshan
Dhananjay Munde News : कांदा निर्यातीबाबत लवकरच मार्ग निघेल; कृषिमंत्री धनंजय मुंडे

छगन भुजबळांचा असा समज असेल की मनोज जरांगे पाटील एकटे आहे; तर तो चुकीचा आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज उभा आहे. जरांगे पाटील यांची लढाई सुरू आहे. मात्र अखिल भारतीय मराठा महासंघाची भूमिका थोडी वेगळी असून मराठा समाजासह देशातील इतर राहिलेल्या समाजासाठी ५० टक्के आरक्षण कोटा वाढवावा आणि वेगळ्या प्रवर्गातून सर्वांना आरक्षण द्यावे; अशी भूमिका मराठा महासंघाची असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप यांनी मांडली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com