Sindhudurg-Kolhapur Travel Saam Tv
महाराष्ट्र

Good News: सिंधुदुर्गवरून कोल्हापूरात जा फक्त दीड तासांत, तयार होतोय नवा घाटमार्ग; कुणाकुणाला होणार फायदा?

Sindhudurg-Kolhapur Travel: सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरमधील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. हा प्रवास आता फक्त दीड तासांचा होणार आहे. कारण याठिकाणी नवा घाटमार्ग तयार होतोय.

Priya More
  • सिंधुदुर्ग ते कोल्हापूर प्रवास आता फक्त दीड तासांत

  • घोटगे- सोनवडे घाट रस्त्याला केंद्र सरकारची मंजुरी

  • ४० वर्षांपासून प्रलंबित घोटगे- सोनवडे घाटमार्गाला मोठे यश

  • कुडाळच्या सोनवडे घाटातून कोल्हापूरला जाणे होणार सोपे

विनायक वंजारे, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गवरून कोल्हापूरला सुसाट जाता येणार आहे. हा प्रवास फक्त दीड तासांचा होणार आहे. कारण याठिकाणी नवा घाटमार्ग तयार होणार आहे. कुडाळ तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घोटगे-सोनवडे घाट रस्त्याला केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करत जोरदार जल्लोष केला. या ऐतिहासिक निर्णयानंतर स्थानिक जनतेने राणे कुटुंबीयांचे विशेष आभार मानले आहेत. ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ग्रामस्थांनी जोरदार जल्लोष केला.

कुडाळच्या घोटगे-सोनवडे घाट हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी गेल्या ४० वर्षांपासून सातत्याने मागणी होत होती. या मार्गासाठी कै. प्राध्यापक महेंद्र नाटेकर आणि कै. सुशांत दळवी यांनी उपोषण करत तीव्र लढा दिला होता. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनीही या मार्गासाठी भरीव पाठपुरावा केला होता. अखेर संघर्षाला मोठे यश आले असून आमदार निलेश राणे यांनी या प्रलंबित मुद्यावर विधिमंडळात आणि प्रशासकीय स्तरावर सतत आवाज उठवून या मार्गासाठी महत्त्वाची प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली आहे.

रस्त्याच्या या महत्त्वाच्या मंजुरीनंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण केल्या जाणार असून नवीन आराखडा आणि तांत्रिक मान्यता निश्चित करणे, केंद्रीय पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून जनसुनावणी आणि भूसंपादन कारवाई झाल्यानंतर प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिक आणि व्यापारी दृष्टीने, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यासाठी तसेच वाहतूक आणि दळणवळणासाठी हा मार्ग अत्यंत सोयीस्कर ठरणार आहे.

जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कुडाळ तालुक्यातून हा घाटमार्ग तयार केला जाणार असल्यामुळे कोल्हापूरला जाण्यासाठी जवळपास ७५ ते ८० किमी अंतर पार करावे लागणार आहे. सध्या आंबोली किंवा फोंडा घाटातून कोल्हापूरला जाण्यासाठी ३ तासांचा कालावधी लागतो. मात्र घोडगे- सोनवडे घाट तयार झाल्यानंतर त्यातून दीड ते २ तासांचा वेळ लागणार आहे. कुडाळच्या सोनवडेतून निघालेला हा घाटमार्ग कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे जोडला जाणार आहे. यामुळे या भागातील दळणवळणाचा प्रश्न सुटून विकासाला मोठी गती मिळणार आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भरत गोगावले यांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट

Mumbai : गर्दीपासून दूर, इतिहासाच्या जवळ! वीकेंडला नक्की फिरा मुंबईत लपलेली 'ही' ५ ठिकाणे

भावानेच घेतला बहिणींचा जीव; सख्या बहिणींवर झाडल्या गोळ्या, रक्षाबंधनाआधी घडलेल्या हत्याकांडानं हरिद्वार हादरलं!

एसटी बसमध्ये बसायला जागा मिळाली नाही; पठ्ठ्यानं असा जुगाड केला की हसावं की रडावं कळेना! VIDEO Viral

Hair Care: केस कोरडे, फ्रिझी आणि निस्तेज झालेत? घरच्या घरी बनवा हा DIY हेअर मास्क; केस दिसतील मऊ आणि चमकदार

SCROLL FOR NEXT