Kudal Tourism : पावसाळ्यात कोकणात गेल्यावर 'कुडाळ' हे ठिकाण नक्की फिरा, पाहा ५ निसर्गरम्य पर्यटन स्थळे

Shreya Maskar

कुडाळ

कुडाळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ठिकाण आहे. कुडाळ कर्ली नदीकाठी वसलेले आहे. कोकणातील हे सुंदर ठिकाण आहे. पावसाळ्यात नक्की फेरफटका मारा.

Kudal | google

भोगवे बीच

भोगवे बीच कारली नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तिथे वसलेला आहे. पक्षीनिरीक्षणासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

Bhogway Beach | google

निवती बीच- किल्ला

निवती बीच खडकाळ कडा आणि निवती किल्ल्याने वेढलेला आहे. तुम्हाला येथे बोटिंगचा अनुभव घेता येतो. तसेच तुम्ही किल्ल्यावर भटकंती करू शकता.

Nivati Beach- Fort | google

सिंधुदुर्ग किल्ला

मालवणपासून बोटीने थोड्या अंतरावर १७ व्या शतकातील भव्य सिंधुदुर्ग हा सागरी किल्ला आहे. जिथून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.

Sindhudurg Fort | google

टाळंबा धरण

कारली नदीवर बांधलेले टाळंबा धरण हिरवाईने नटलेले असून येथे पावसाळ्यात थंड वातावरण अनुभवता येते. तसेच इंद्रधनुष्याचा सुंदर नजारा दिसतो.

Talamba Dam | google

तारकर्ली बीच

तारकर्ली बीच पांढरी शुभ्र वाळू आणि स्वच्छ पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. पोहणे, वॉटर स्पोर्ट्स , बोटिंगचा येथे आनंद घेता येतो. येथील सी फूड देखील उत्तम चवीचे आहे.

Tarkarli Beach | google

सुनामी आयलंड

सुनामी आयलंड हे देवबाग-तारकर्ली खाडीच्या जवळच असून नैसर्गिकरित्या तयार झाले आहे. कयाकिंग, बनाना बोट राईडचा येथे आनंद घेता येतो.

Tsunami Island | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : सांगलीतील 'या' हिल स्टेशनसमोर लोणावळा-खंडाळाही फिके पडेल, पावसाळी ट्रिपसाठी परफेक्ट लोकेशन

Sangli Hill Station | saam tv
येथे क्लिक करा...