Shreya Maskar
दंडोबा हिल स्टेशन हे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील 'भोस' गावाजवळ वसलेले आहे. पावसाळ्यात फॅमिली ट्रिपसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
दंडोबा हिल स्टेशन सांगली शहरापासून सुमारे ३७ किमी आणि मिरज शहरापासून ३२ किमी अंतरावर आहे. मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरून येथे सहज पोहोचता येते.
दंडोबा हिल स्टेशन हे दंडोबा हिल्स फॉरेस्ट रिझर्व्ह म्हणूनही ओळखले जाते. पावसाळ्यात येथे धुक्याची चादर, इंद्रधनुष्याचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
दंडोबा हिल स्टेशन येथे भगवान शिवाला समर्पित प्राचीन गुहा-मंदिर आहे. येथे शांत वातावरण अनुभवता येते.
दंडोबा हिल स्टेशनला ट्रेकिंग आणि हायकिंगचा आनंद घेता येतो. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे नक्की जा. येथे निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटोज काढता येतात.
दंडोबा हिल स्टेशनच्या परिसरात 'टेहळणी बुरूज' आहे. याला इतिहासात मोठे महत्त्व आहे. हिल स्टेशनला गेल्यावर तुम्हाला सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळेल.
दंडोबा हिल स्टेशनला गेल्यावर तुम्हाला जवळून वन्यजीवन अनुभवता येईल. विविध प्राणी आणि पक्षी येथे पाहायला मिळतात.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.