Maharashtra Fort : ट्रेकिंगची आवड आहे? मग पावसाळ्यात महाराष्ट्रातील 'हे' गड-किल्ले नक्की फिरा

Shreya Maskar

लोहगड किल्ला

लोहगड किल्लालोणावळ्याजवळ आहे. हा ट्रेकिंगचा सधा-सोपा पिकनिक स्पॉट आहे. येथून पवना धरणाचे विहंगम दृश्य दिसते.

Lohagad Fort | google

विसापूर किल्ला

लोहगडच्या अगदी शेजारी विसापूर किल्ला आहे. तुम्ही येथे वीकेंडला ट्रेकिंगचा प्लान करू शकता. येथे तुम्हाला धबधब्याच्या प्रवाहातून गड चढावा लागतो. पावसाळ्यातील ट्रेकिंगचा थरार अनुभवाल.

Visapur Fort | google

राजमाची किल्ला

लोणावळा आणि कर्जत यांच्या दरम्यान राजमाची किल्ला वसलेला आहे. येथे आजूबाजूला पावसाळ्यात धबधबे वाहताना दिसतात.

rajmachi fort | google

हरिश्चंद्रगड किल्ला

हरिश्चंद्रगड किल्ला अहमदनगर जिल्ह्यात वसलेला आहे. येथून प्राचीन गुहा आणि प्रसिद्ध 'कोकण कडा' पाहता येतात.

Harishchandragarh Fort | google

हरिहर किल्ला

हरिहर किल्ला खडकात कोरलेल्या आणि जवळजवळ ८० अंशांच्या कोनात असलेल्या उभ्या पायऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे ट्रेकिंगसाठी आव्हानात्मक ठिकाण आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे धुक्याची चादर पाहायला मिळते.

Harihar Fort | google

कोरीगड किल्ला

आंबी व्हॅलीजवळ कोरीगड किल्ला आहे. हा सोपा ट्रेकिंग स्पॉट आहे. हा किल्ला हिरव्यागार दऱ्यांनी वेढलेला आहे. किल्ल्याच्या माथ्यावर एक विशाल पठार आहे जिथे हिरवीगार कुरणे आणि मंदिरे आहे.

Korigarh Fort | google

तिकोना किल्ला

तिकोना किल्ला हा वितंडगड म्हणूनही ओळखला जातो. येथून ट्रेकर्सना पवना सरोवराचे ३६०-अंशांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.

Tikona Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : जिंजी किल्ला पाहायला जाताय? मग जवळच असलेली ‘ही’ ५ स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन्स नक्की फिरा

Gingee Fort | saam tv
येथे क्लिक करा...