Mumbai-Pune New Highway Approved : पुणेकरांना मुंबईत येण्यासाठी नवा वेगवान मार्ग; १३४ किमीच्या चौपदरी महामार्गाला मंजुरी, प्रवास होणार सोयीस्कर

Neral Shirur Four Lane Road: राज्य सरकारने नेरळ ते शिरूर १३४ किमी चौपदरी महामार्गाला मंजुरी दिली आहे. या नव्या मार्गामुळे पुणे-मुंबई प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.
Mumbai-Pune New Highway Approved
Pune-Mumbai New Highway Approved routegoogle
Published On

सध्याची वाढती वाहतूक कोंडी ही नकोशी झालीये. त्यात उन्हाचा पारा इतका वाढलाय की, प्रवास करतानाही अनेकांना उष्माघाताचा त्रास होतो. याने प्रवास वेळेवर होत नाही आणि उन्हामुळे सध्या काही गंभीर समस्यांनाही सामोरं जावं लागतं. याचाच विचार करून राज्य सरकारने एक सगळ्यांना फायदेशीर उपाय काढला आहे. त्यामध्ये मुंबईला जाण्यासाठी पुणेकरांना नवा आणि वेगवान मार्ग सुरु करण्यात आला आहे.

नवा मार्ग कुठून कुठपर्यंत असेल?

राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे नेरळ ते शिरूर दरम्यान १३४ किलोमीटर लांबीचा चौपदरी महामार्ग उभारण्याची मंजुरी दिली आहे. नवा मार्ग हा रायगड जिल्ह्यातल्या नेरळपासून सुरु होणार आहे. तर वांद्रे, पाईप, पाबळ आणि मलठण मार्गे थेट शिरुरपर्यंत हा मार्ग जाईल. पुणे अहिल्यानगर तसेच मराठवाड्यातील वाहनांना मुंबईकडे जाण्यासाठी हा एक नवा आणि जलद पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.

Mumbai-Pune New Highway Approved
Prajakta Mali Cannes look: प्राजक्ता माळीची कान्समध्ये मराठमोळी एंट्री; नऊवारी साडीतील लूकची परदेशी फोटोग्राफर्सनाही पडली भुरळ

नागरिकांच्या समस्या काय?

सध्या या भागातल्या बऱ्याच वाहतूक पुणे शहरातूनच मुंबईकडे जाते. त्यामुळे पुणे-शिरूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नागरिक त्रस्त होतात. पण हा नवा महामार्ग सुरु झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.

प्रकल्पाचा फायदा कोणाला होणार?

नेरळ ते शिरूर या प्रकल्पाचा सर्वात जास्त फायदा हा पुणे आणि मुंबईदरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहनांची संख्या कमी झाल्याने प्रवासाचा वेळ सुद्धा कमी होणार आहे. तसेच शिरूर, चाकण आणि आसपासच्या भागातील नागरिकांना मुंबई गाठण्यासाठी सोयीस्कर आणि जवळचा मार्ग मिळेल. नव्या मार्गामुळे पुण्यात प्रवेश न करता थेट मुंबईकडे जाणं शक्य होईल. त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा आहे.

Mumbai-Pune New Highway Approved
PM Kisan Samman Nidhi: PM किसान योजनेत बाप-लेक दोघांनाही मिळू शकतात 2000 रुपये? जाणून घ्या नियम...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com