Prajakta Mali Cannes look: प्राजक्ता माळीची कान्समध्ये मराठमोळी एंट्री; नऊवारी साडीतील लूकची परदेशी फोटोग्राफर्सनाही पडली भुरळ

Sakshi Sunil Jadhav

मराठी सिनेसृष्टीचं प्रतिनिधित्व

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने यंदाच्या Cannes Film Festival मध्ये पहिल्यांदाच रेड कार्पेटवर हजेरी लावत मराठी सिनेसृष्टीचं प्रतिनिधित्व केलं आहे.

Prajakta Mali Cannes 2026

मराठमोळा लुक

प्राजक्ताने खास मराठमोळा अंदाज जपत पारंपरिक नऊवारी साडी, नथ, गजरा आणि दागिन्यांसह लूक पुर्ण केला आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीची झलक आंतरराष्ट्रीय मंचावर पाहायला मिळणार आहे.

Prajakta Mali Cannes 2026

विशेष कौतुक

प्राजक्ता माळीने तिच्या या लूकने फक्त भारतीय चाहत्यांनाच नाही तर परदेशी फोटोग्राफर्स आणि फॅशन मीडियाचंही लक्ष वेधून घेतलं. अनेकांनी तिच्या पारंपारिक लुकचं त्यांनी कौतुकही केलं आहे.

Prajakta Mali Viral Cannes Look

सोशल मीडियावरची चर्चा

सोशल मीडियावर प्राजक्ताच्या रेड कार्पेटचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Prajakta Mali Viral Cannes Look

चाहत्यांकडून कौतुक

“मराठी संस्कृतीचा अभिमान”, “ग्लोबल मंचावर मराठमोळा ठसा” आणि “खऱ्या अर्थाने भारतीय सौंदर्य” अशा प्रकारच्या कमेंट्स चाहते तिला करत आहेत.

Prajakta Mali Viral Cannes Look

कान्सलूक

कान्ससारख्या ग्लॅमरस आंतरराष्ट्रीय मंचावर वेस्टर्न आउटफिटऐवजी पारंपरिक मराठी पेहराव निवडून प्राजक्ताने स्वतःची वेगळी अन् लोकांच्या कायम लक्षात राहील अशी ओळख निर्माण केली.

Marathi Culture At Cannes

ट्रेंडिंग फॅशनेबल लूक

प्राजक्ताच्या कॉन्फिडंस, स्माईल आणि एलिगंट वॉकमुळे अनेक फॅशनप्रेमींमध्ये तिच्या लूकची चर्चा सुरू असून हा लूक ट्रेंडिंग फॅशन स्टेटमेंट ठरत आहे.

Marathi Culture At Cannes

सांस्कृतिक परंपरेचं प्रतिनिधित्व

प्राजक्ता माळीचा हा लूक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं प्रतिनिधित्व करणारा मानला जात असून अनेकांनी नऊवारी साडीचा जागतिक सन्मान असंही म्हटलं आहे.

Marathi Culture At Cannes

इतर कलाकार

यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय कलाकारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली. त्यात मराठी कलाकारांचाही सहभाग विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

Marathi Culture At Cannes

NEXT: तु तर मोरनी..., गौतमी पाटीलचा साडीतला नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल

Tu Tar Morni trend
येथे क्लिक करा