महाराष्ट्राच्या राजकारणाची नाडी आणि ग्रामीण अर्थकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या संपूर्ण राज्यात जोरदार सुरू आहे. अहिल्यानगर, सांगली, पुणे आणि सातारा या प्रमुख जिल्ह्यांमधील बँकांच्या निवडणुकांमुळे रोज नवे ट्विस्ट समोर येतायत... पक्षांच्या चौकटी ओलांडून सहकारातील सत्ता राखण्यासाठी एका बाजूला जुने वैरी एकत्र येत आहेत, तर कुठे युती- आघाडीच्या मैत्रीत फुट पडतेय...
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्याच्या राजकारणाची सर्व जुनी गणिते मोडून पडलीयत...
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे पारंपरिक वैरी या निवडणुकीत प्रथमच एकत्र येण्याची चिन्हे आहेत
दुष्काळाचे कारण देत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विखे-थोरात यांच्यात पहिली बैठकही झाली....
दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी विखे-थोरात यांच्या निर्णयासोबत असल्याचे सांगितले.
मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी अर्ज दाखल करत प्रस्थापितांविरोधात लढा देणार असल्याचं जाहीर केलयं..
दुसरीकडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी भाजपनं मोर्चेबांधणी सुरु केलीय...सध्या बँकेवर जयंत पाटलांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय सत्ता आहे...या निवडणुकीत जयंत पाटलांचे कट्टर विरोधक असणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांनी शड्डू ठोकलाय...तर महायुतीतील दादांच्या राष्ट्रवादीच्या आणि शिंदेसेनेतील एका गटानं जयंत पाटलांसोबत राहण्याची भूमिका घेतलीय...
दरम्यान पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 'अ' गटातून सलग तीन वेळा निवडून आलेले काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन थोपटे रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. यामुळे भोरच्या राजकारणात 'थोपटे विरुद्ध थोपटे' असा थेट आणि चुरशीचा सामना रंगण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चार मंत्र्यांसह दोन खासदार आणि तीन आमदार आखाड्यात उतरलेत. त्यामुळे मोठा चुरशीचा सामना बघायला मिळू शकतो.
मुळात सहकार क्षेत्रातील निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नसल्यामुळे इथे राजकीय पक्षीय निष्ठांपेक्षा स्थानिक ताकद, कारखानदारी आणि वैयक्तिक हितसंबंधांना अधिक महत्त्व दिले जाते.
मात्र यानिमित्तानं संपूर्ण राज्यात कट्टर विरोधक म्हणून सर्वांना परिचित असलेले विखे-थोरातांचं एकत्र येणं सर्वांसाठीच धक्का देणारं आहे. मात्र ही आघाडी इतर निवडणुकांमध्येही दिसणार का? याबाबत उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.