Manasvi Choudhary
केळी खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो.अनेक डाएट प्रेमी नियमितपणे केळी खातात.
मात्र केळी खाल्ल्याने आरोग्याला नेमके कोणते फायदे होतात. दररोज 45 दिवस रोज १ केळी खाल्ल्याने शरीरात नेमके कोणते बदल होतात हे पाहून घ्या.
केळीमध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज यांसारखी नैसर्गिक शर्करा असते. रोज एक केळं खाल्ल्यामुळे शरीराला दिवसभर टिकून राहणारी ताजी ऊर्जा मिळते आणि थकवा किंवा आळस दूर होतो.
केळीमध्ये डायटरी फायबर असतो. यामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता किंवा अपचनाचा त्रास दूर होतो.
केळीमध्ये व्हिटॅमिन बी-६ आणि ट्रायप्टोफान असते जे मन शांत राहते, नैराश्य कमी होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
केळीमध्ये असलेले प्रीबायोटिक घटक शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करतात, ज्यामुळे हाडे आणि सांधे मजबूत होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.