रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

Manasvi Choudhary

ब्लॅक कॉफीचे फायदे

आपल्यापैकी अनेकजण सकाळी उठल्यानंतर कॉफी पितात. अनेक डाएटप्रेमी वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी पितात.

Is Drinking Black Coffee on an Empty Stomach Good or Bad

ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे आण तोटे

मात्र रिकाम्यापोटी ब्लॅक कॉफी प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Is Drinking Black Coffee on an Empty Stomach Good or Bad

ऍसिडिटी आणि पोटात जळजळ

ब्लॅक कॉफीमध्ये अमिनो आणि कॅफिनचे प्रमाण जास्त असते. रिकाम्या पोटी कॉफी पिल्याने पोटात ऍसिड तयार होण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे छातीत जळजळ आणि ऍसिडिटीचा तीव्र त्रास होऊ शकतो.

Acidity & Heartburn | saam tv

पचनक्रिया बिघडते

सकाळी रिकाम्या पोटी कॅफिन गेल्यामुळे गॅस्ट्रिक ज्यूसची निर्मिती वेगाने होते, ज्यामुळे पचनसंस्थेचे कार्य बिघडते आणि अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते.

Improves Digestion | pinterest

तणाव आणि चिंता वाढते

रिकाम्या पोटी कॅफिन शरीरात गेल्यामुळे कोर्टिसोल (Cortisol - Stress Hormone) लेव्हल अचानक वाढते. यामुळे दिवसभर अस्वस्थता, मानसिक ताण आणि चिंता जाणवू शकते.

Stress and Anxiety | pinterest

रक्तातील साखरेची पातळी बिघडते

काही अभ्यासानुसार, रिकाम्या पोटी कॉफी पिण्यामुळे शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता प्रभावित होते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते.

Blood Sugar Level

शरीरातील पाणी कमी होणे

कॉफी एक प्रकारची डायुरेटिक आहे, म्हणजेच ती लघवीचे प्रमाण वाढवते. सकाळी पाणी न देता थेट कॉफी पिल्याने शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते.

Dehydration | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Cashews Vs Almonds: काजू आणि बदाम, आरोग्यासाठी कोणतं ड्रायफ्रुट्स फायदेशीर?

Cashews Vs Almonds
येथे क्लिक करा...