Manasvi Choudhary
निरोगी आणि फिट राहण्यासाठी ड्रायफ्रुट्सचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक मानले जाते.
काजू आणि बदाम हे दोन ड्रायफ्रुट्स आपण आवडीने खातो पण यापैकी नेमके कोणते आरोग्यासाठी फायदेशीर ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
काजूमध्ये मोनोअनसॅचुरेटेड फॅटी अॅसिडचे असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
काजूमध्ये कॉपर, मॅग्नेशियम आणि लोह भरपूर असते, जे हाडे मजबूत करण्यासाठी आणि शरीराला इन्स्टंट ऊर्जा देण्यासाठी उत्तम ठरतात.
ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी काजू खाणे महत्वाचे आहे.
बदाम हे व्हिटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडने समृद्ध असते. यामुळे मेंदूचे कार्य सुधारते आणि स्मरणशक्ती तल्लख होण्यास मदत होते.
बदामामध्ये फायबर आणि प्रथिने उच्च प्रमाणावर असतात, ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
बदामातील व्हिटॅमिन ई त्वचेला नैसर्गिक चमक आणि केसांना मजबूत बनवण्याचे काम करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.