लालचुटूक बीट खाण्याचे १० अद्भूत फायदे, मोजक्याच लोकांना माहीत असतील

Manasvi Choudhary

बीट

सॅलड असो वा ज्यूस लालचुटूक बीट आवर्जून खाल्ले जाते. दिसायला अगदी साधे वाटणारे हे कंदमूळ आरोग्यासाठी एक वरदान मानले जाते. बिटामध्ये फोलेट, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात.

Beetroot | pinterest

उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो

बीटमध्ये रक्ताभिसरण करणाऱ्या रक्तवाहिन्या मोकळ्या करण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तप्रवाह सुलभ होतो आणि उच्च रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.

Controls High Blood Pressure | pinterest

स्टॅमिना आणि ऊर्जा वाढते

जे लोक जिम किंवा नियमित व्यायाम करतात, त्यांच्यासाठी बीट अत्यंत उपयुक्त आहे. बीटमधील नायट्रेट्स स्नायूंना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतात, ज्यामुळे व्यायामादरम्यान सहनशक्ती वाढते.

Boosts Stamina & Energy | freepik

यकृताचे कार्य सुधारते

बीटमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि लिव्हर डिटॉक्सिफाय करणारे गुणधर्म असतात. ही पोषक तत्त्वे शरीराला ऑक्सिडेटिव्ह ताणाशी लढण्यास आणि यकृताचे कार्य अधिक सुधारायला मदत करतात.

Liver | pinterest

शरीरातील जळजळ कमी होते

बीटरूटमध्ये शक्तिशाली दाहशामक गुणधर्म असतात. यात आढळणारे विशिष्ट अँटीऑक्सिडंट्स शरीरातील अंतर्गत जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करतात.

Reduces Inflammation

पचनक्रिया सुधारते

बद्धकोष्ठता किंवा अपचनाचा त्रास असणाऱ्यांसाठी बीट फायदेशीर ठरते. यात असणाऱ्या फायबरमुळे पोट साफ राहण्यास आणि पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत होते.

Aids Digestion

त्वचेवर नैसर्गिक तेज येते

बीटचे नियमित सेवन केल्याने किंवा त्याचा ज्यूस प्यायल्याने रक्तातील विषारी घटक बाहेर पडतात. रक्त शुद्ध झाल्यामुळे चेहऱ्यावर गुलाबी आणि नैसर्गिक चमक येते.

Promotes Glowing Skin

वजन नियंत्रणात राहण्यास मदत

बीटमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते, वजन नियंत्रणात राहते.

Weight Loss | pinterest

स्मरणशक्ती आणि मेंदूचे आरोग्य सुधारते

बीटमधील नायट्रेट्स मेंदूतील रक्तपुरवठा वाढवण्यास मदत करतात. यामुळे वाढत्या वयासोबत विसरभोळेपणाची समस्या कमी होऊन मेंदूचे कार्य सुधारते.

Boosts Brain Function

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते

व्हिटॅमिन सी आणि आवश्यक खनिजांनी समृद्ध असलेले बीट शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून विविध आजारांशी लढण्याची ताकद देते.

BOOST IMMUNITY POWER | PINTREST

NEXT: How Much Water To Drink Daily: 1, 2, 3, 4, की 5, दररोज किती लिटर पाणी प्यावे? नेमकं प्रमाण जाणून घ्या

How Much Water To Drink Daily
येथे क्लिक करा...