भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

BJP Reshuffles Yuva Morcha In Maharashtra: भाजपने महाराष्ट्र युवा मोर्चाची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केलीय. नव्या टीममध्ये 29 पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली असून सर्व पदाधिकारी 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.
BJP Reshuffles Yuva Morcha In Maharashtra
BJP appoints 29 office bearers in Maharashtra Yuva Morchasaam tv
Published On: 
Summary
  • भाजपने महाराष्ट्र युवा मोर्चाची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली

  • नव्या कार्यकारिणीत 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना प्राधान्य देण्यात आले आहे.

  • रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार सुनील राणे आणि कृष्णराज महाडिक यांनी नव्या टीमची घोषणा

महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजपने युवा मोर्चाची ही नवी फळी मैदानात उतरवलीय. 29 पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर आता संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण वर्गाला पक्षाशी जोडण्याची जबाबदारी देण्यात आलीय. पक्षातील संघटनात्मक बदल करण्यात आल्यानंतर आता भाजपकडून युवा मोर्चात मोठा बदल करण्यात आलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजप युवा मोर्चाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना संधी देण्यात आलीय.

प्रदेश सरचिटणीस युवा मोर्चा प्रभारी सुनील राणे आणि युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी भाजप युवा मोर्चाच्या नव्या प्रदेश टीमची अधिकृत घोषणा करण्यात आलीय. या नव्या कार्यकारिणीत एकूण 29 पदाधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे. या निर्णयामुळे भाजपच्या युवा आघाडीत नवा उत्साह पाहायला मिळतोय. दरम्यान या नव्या टीमच्या घोषणेनंतर आता लवकरच जिल्हा आणि तालुका स्तरावरील युवा मोर्चाच्या नव्या कार्यकारिणी जाहीर केल्या जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

BJP Reshuffles Yuva Morcha In Maharashtra
Rajyasbha Election: भाजपमध्ये मोठा फेरबदल होणार; मोदी सरकारमधील दोन केंद्रीय मंत्री देणार राजीनामा?

या नव्या कार्यकारिणीत तरुणाईला प्राधान्य देण्यात आले आहे. संधी देण्यात आलेल्या उमेदवारांचे वय हे 35 वर्षांपेक्षा कमी आहे. पक्ष संघटनेत आक्रमक आणि नव्या दमाच्या तरुणांना संधी देऊन आगामी निवडणुकांच्या रिंगणात पक्षाची ताकद वाढवण्याचा भाजपचा हा मोठा मास्टरस्ट्रोक मानला जातोय.

BJP Reshuffles Yuva Morcha In Maharashtra
कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

जाहीर करण्यात आलेल्या या यादीत राज्यातील विविध विभागांतील तरुण चेहऱ्यांना स्थान मिळालंय. पक्षाची ध्येयधोरणे आणि कामे तळागयाळातील तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही नवी टीम सज्ज झालीय. 35 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील चेहऱ्यांना संधी देऊन भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय.

शंभवी साळेकडे युवती प्रमुखाची धुरा

भाजपच्या या नव्या कार्यकारिणीत अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'युवती प्रमुख' (Yuvati Pramukh) पदाची जबाबदारी 28 वर्षीय शंभवी साळे (Shambhavi Sale) हिच्याकडे सोपवण्यात आली. शंभवी साळे या नांदेडच्या आहेत. राज्यातील युवतींचे संघटन मजबूत करणे आणि तरुणींच्या प्रश्नांवर भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठवणे, ही मुख्य जबाबदारी आता शंभवी साळे पार पाडणार आहेत. शंभवी साळे यांच्या निवडीमुळे राज्यातील युवती संघटकांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com