Bullet Train google
महाराष्ट्र

Bullet Train: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! राज्यात बुलेट ट्रेनच्या कामाला वेग, मुंबईतील भूमिगत स्थानकाचा पहिला बेस स्लॅब पूर्ण

Mumbai Bullet Train: भारतातील पहिल्या मुंबई-अदमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. अशातच आता एकमेव भूमिगत बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाला वेग आला आहे.

Dhanshri Shintre

देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला राज्यात गती मिळाली आहे. गुजरातमध्ये या प्रकल्पाची वेगात कामे सुरू असून आता राज्यातही या प्रकल्पांच्या कामांनी वेग घेतला आहे. या प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुल येथे भूमिगत स्थानकाचा उभारणीतील महत्वाचा टप्पा असलेला पहिला बेस स्लॅब टाकण्याचे काम नुकताच पूर्ण झाले.

हा स्लॅब ३२ मीटर खोलीवर टाकण्यात आला असून तो १० मजली इमारती एवढा आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम हाती घेतले आहे. बुलेट ट्रेन ५०८ किमी लांबीची असून या मार्गावरील वांद्रे-कुर्ला संकुल हे एकमेव स्थानक भूमिगत स्वरूपात बांधले जाणार आहे. या स्थानकाचा पहिला काँक्रीट बेस स्लॅब ३० नोव्हेंबर रोजी टाकण्यात आला. हा स्लॅब जमिनीपासून सुमारे ३२ मीटर खोलीवर टाकण्यात आला आहे. जमिनीच्या पायापासून काँक्रीटचे काम सुरू करण्यात आले आहे.

बुलेट ट्रेन मार्गिकेवर एकूण १२ स्थानके असणार आहेत. यामधील आठ स्थानकांची गुजरातमध्ये, तर चार स्थानकांची महाराष्ट्रात उभारणी केली जाणार आहे. यामध्ये वांद्रे-कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदे, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे.

या स्टेशनसाठी टाकल्या जाणाऱ्या ६९ स्लॅबपैकी हा पहिला आहे, जो बुलेट ट्रेन स्टेशनचा सर्वात खालचा भाग आहे. भूमिगत स्टेशनचे बांधकाम तळापासून वरच्या पद्धतीने केले जात आहे, त्यामुळे स्टेशनचा बेस बनवण्याचे काम सुरु झाले असून काँक्रिटीकरण करण्यात येत आहे.

या स्लॅबद्दलची महत्त्वाची माहिती

- या स्लॅबसाठी ६८१ मेट्रिक टन उच्च दर्जाचे स्टील वापरले

-६२०० रीबार कपलरचा वापर झाला

-२२५४ घनमीटर M६० ग्रेड काँक्रीट

-४२८३ मेट्रिक टन एग्रीगेटचा वापर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT