मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी पुण्यातून येणार खास 'केशर पगडी', जनतेला दिसणार राज्यातील मंत्र्यांचा वेगळा लूक

Look For Swearing in Ceremony : उद्या महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. या विशेष कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा खास लूक असणार आहे.
yandex
yandex
Published On

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून उद्या सायंकाळी ५ वाजता मुंबईतील आझाद मैदान येथे महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान यांच्यासह विविध राज्यातील मुख्यमंत्री उद्याच्या शपथविधी उपस्थित राहणार आहे. या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असताना पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांसाठी खास तुकाराम पगडी बनविण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,अजित पवार, सुनील तटकरे,धनजंय मुंडे,प्रफुल्ल पटेल,पंकजा मुंडे याच्या नावाची पगडी बनवण्याची ऑर्डर तयार करण्यात आल्या आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राज्यातील मुख्यमंत्री उद्याच्या शपथविधी उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असताना पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, शिवसेना शिंदे गटातील नेत्यांसाठी खास तुकाराम केशर पगडी बनविण्यात आल्या आहेत.

yandex
Devendra Fadnavis: फडणवीसांना मुख्यमंत्रिपद मिळेल, या खात्रीने त्यांच्यासाठी नागपूरमध्ये शिवण्यात आला खास कोट

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हे जवळजवळ निश्चित झालंय. याच पार्श्वभूमीवर नागपुरातील गोविंदा कलेक्शनचे पिंटू मेहाडिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी त्यांच्या आवडत्या रंगाचे कोट शिवलेले आहे. ५ तारखेला होणारे शपथविधी सोहळ्यासाठी त्यांनी यातील एक कोट घालावा अशी इच्छा असल्यामुळे त्यांनी हे कोट शिऊन मुंबईला घेऊन गेले आहे. देवेंद्र फडणवीस हे लाडक्या बहिणीचे देवा भाऊ असले तरी माझे देवेन भाऊ आहे आणि त्यांनी मुख्यमंत्री होत असताना यातील एक कोट घालावा अशी इच्छा असल्याचही पिंटू मेहाडिया यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं.

yandex
Devendra Fadnavis: मी पुन्हा आलो! देवेंद्र फडणवीसच होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष केला जात आहे. राज्यभरातील भाजपच्या कार्यालयांसमोर जल्लोष केला जात आहे. एकमेकांना लाडू भरवत, फटाके फोडत आनंद साजरा केला जात आहे. विधिमंडळ गट नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यामुळे त्यांना भेटून शुभेच्छा देणार आहेत. उदय सामंत, अर्जुन खोतकर, अब्दुल सत्तार, भरत गोगावले, किशोर आप्पा पाटील आणि इतर नेते भेटून शुभेछा देणार आहेत.

yandex
Maharashtra Politics: नागपुरातील चहावाला जाणार महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी कार्यक्रमाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com