Maharashtra Politics: नागपुरातील चहावाला जाणार महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी कार्यक्रमाला

Maharashtra Politics: एकीकडे शपथविधीला काही तास शिल्लक असताना दुसरीकडे मात्र महायुतीत अजूनही मुख्यमंत्रिपदावरून नाव निश्चित होत नाही. मात्र आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politics
Published On

विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेनं भरभरुन मत दिलं आहे. महायुतीच्या बाजूंनी कौल लागला आहे. निवडणूक निकाल लागून एक आठवडा उलटून गेल्यानंतरही महायुतीचे सरकार अजून स्थापन होत नाही आहे. पण अखेर आता गुरुवारी 5 डिसेंबर रोजी शपथविधीचा मुहूर्त ठरला असून, मुंबईतील आझाद मैदान येथे 5 डिसेंबर रोजी भव्य-दिव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. एकीकडे शपथविधीला काही तास शिल्लक असताना दुसरीकडे मात्र महायुतीत अजूनही मुख्यमंत्रिपदावरून नाव निश्चित होत नाही. मात्र आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

5 डिसेंबर रोजी महायुतीचा भव्य-दिव्य असा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज (सोमवारी) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार प्रवीण दरेकरांनी आझाद मैदानावरती जाऊन शपथविधी सोहळ्याचे कशा प्रकारे तयारी सुरू आहे, काम कुठपर्यंत आले आहे, याचा आढावा घेतला जातोय.

Maharashtra Politics
Sanjay Raut: 'गृहमंत्रिपद हा एकच वादाचा विषय नाही', संजय राऊतांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

महायुतीच्या शपथविधीला देवेंद्र फडणवीस आणि नागपुरातील काही खास लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यातीलच एक देवेंद्र फडणवीस यांचे फॅन असलेले गोपाल बावनकुळे हे सुद्धा आहे. गोपाल बावनकुळे हे रामनगर परिसरामध्ये टी स्टॉल चालवतात या ठिकाणी मात्र त्यांनी आपल्या टी स्टॉलवर कुठल्या देवीदेवतांचा फोटो आला होता त्यांची देवेंद्र फडणवीस ह्यांच्यावर असलेलं प्रेम आणि दैवत मनात त्यांचा फोटो दुकानात लावला. त्यांचा कार्यालयातून निमंत्रण आल्याचं सांगत आहे.

Maharashtra Politics
Mumbai Local Train: पुणे, मुंबईतील 'या' स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री ८ दिवस बंद, रेल्वेनं का घेतला निर्णय?

देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे चहा प्यायला आलेले होते. त्यावेळी मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा चहा प्यायला या असे आमंत्रित दिलं होत. त्यांनी त्याला होकार दिला होता. मुख्यमंत्री होत असल्याचा आनंद आहे. मी मुंबईला शपथविधी सोहळ्यासाठी जात आहे. पण त्यादिवशी माझी चहा कॅन्टीन सुरू राहील. मोफत चहा वाटणार असेही गोपाल बावनकुळे यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं.

Maharashtra Politics
Thane Water Shortage: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! रविवारपर्यंत पाणीकपातीच्या झळा; कधी कुठे पाणीपुरवठा राहणार बंद?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com