
राज्यात निवडणुकांचे निकाल लागले असून राज्यात पुन्हा एकदा भाजप सरकार येणार आहे. निकालानंतर ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा देखील होणार आहे. पण मुख्यमंत्री कोण होणार? हे माहीत नाही. अशातच शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. तसेच नरेंद्र मोदींवर देखील त्यांनी हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले कू, जे संकटात आहेत ते नरेंद्र मोदी, अमित शाह आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाला राजकीय स्वार्थामुळे आणि त्याला सुप्रीम कोर्टाने फूस लावली चंद्रचूड यांनी. देशांमध्ये निवडणूका जिंकण्यासाठी त्यांनी ठिणगी टाकली त्याचा परिणाम जगातल्या ज्या ज्या भागामध्ये हिंदू मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्यावर होत आहे.
नेपाळ, कॅनडा, बांग्लादेश, पाकिस्तान हिंदूंवर हल्ले झाले. मोदींची निवडणुका जिंकण्यासाठीची धोरणं हल्ल्यांना जबाबदार आहेत. जगभरात हिंदू लोक संकटात याला मोदी जबाबदार आहे. हिंदूंना सर्वात जास्त धोका मोदींपासून आहे. मोदी धोरणात्मक निर्णय का घेत नाहीत. शिंदे भविष्यात भाजपासोबत राहतील का? हा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांचे मुख्य मुद्दे
शिंदे कोण हा प्रश्न लोकांना पडला आहे.
बटेंगे तो कटेंगेंच्या घोषणांनी तरुणांची माथी भडकवली गेली.
एका गृहमंत्रिपदावरुन राज्याचं सरकार अधांतरी पडलं.
भाजपनं मनात आणलं तर समोरच्यांच्या मागण्या एका मिनिटांत चिरडतील.
फक्त एक गृहमंत्रीपद हा सत्तेस्थापनेत वादाचा विषय असू शकत नाही.
फडणवीसांच्या जागी कोणी वेगळं आणलं जातंय का?
गृहखात्याचा वापर करुन शिंदे गट भाजपच्या अंगावरही जाऊ शकतं.
शाहांना खरे ठाकरे आणि बाळासाहेबांचं नाव नको होतं.
राजरकारणातून ठाकरे शिवसेना संपवण्याचं शाहांचं स्वप्न होतं.
शाहांना डुप्लिकेट शिवसेना उभी करायची होती.
एका गृहमंत्री पदामुळे महाराष्ट्राचा सरकार आधांतरी लटकून पडला आहे. हे कसलं मजबूत सरकार? तुमच्याकडे बहुमताचा आकडा आहे तुमच्या सोबत अजित पवार आहेत. शिंदे गटाचे लोक तुमच्या सोबत आहेत नाहीत माहित नाही. भविष्यात ते काय करतील माहीत नाही. राजभवनात तुम्ही सत्ता स्थापनेचा दावा करायला तयार नाही आहात. राज्यपालांकडून अजून तुम्ही सत्ता स्थापनेचा निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही आधीच मांडव घातला? राजभवन तुम्ही चालवत आहात का? हे एका गृहमंत्री पदावरून थांबलेलं नाही. हे जे मागण्या करतायेत ना भाजपने ठरवलं तर एका मिनिटात चिरडून टाकतील. समोरची लोक घाबरट आहेत. फक्त गृहमंत्रीपद सरकार स्थापनेमधला विषय असू शकत नाही. फडणवीसांच्या जागी वेगळे कोणी आणलं जातंय का? त्यासाठी सरकार स्थापना थांबली आहे का? उद्यापर्यंत या सगळ्याचा उलगडा व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही आमचं पुस्तक उघडू. शिंदेंना गृहमंत्रीपद यासाठी हवा आहे कारण त्यांना पोलिसांचे सलाम हवे आहेत. या पदाचा वापर करून त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले दहशत निर्माण केली असे संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.
मोहन भागवत यांना देशाच्या लोकसंख्येबद्दल खूप चिंता होत आहे. 150 करोड लोकसंख्या झाली आहे अजून किती लोकसंख्या मोहन भागवत वाढवणार आहेत. तुमचं सरकार कॉमन सिविल कोड आणायचा ठरवत आहे. कुटुंब कल्याण, कुटुंब नियोजनची योजना चालवत आहे आणि भाजपची पेरेंट बॉडी आरएसएस सांगते मुलं वाढवा. 150 कोटी लोकसंख्या असताना सुद्धा लोकसंख्या वाढवा. आपल्याकडे रोजगार आहे का आपली सरकार नोकरी देत आहे का? शिक्षण फ्री आहे का? महिलांची सुरक्षा होत आहे का? यावर सरसंघचालक का बोलत नाहीत? विविध देशात हिंदू संकटात आहे. जगभरातील हिंदूंची रक्षा मोदी करत नाहीयेत. मोहन भागवत यांनी नरेंद्र मोदी यांना बोलवावं, त्यांची पाठशाला घ्या, दुष्यंत दवे जे बोलतात ते अगदी बरोबर आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भाजपचा माणूस असल्यासारखं काम केलं आहे. हे दुष्यंत दवे यांचं म्हणणं आहे आणि हे खरं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.