Baba Adhav: ईव्हिएम विरोधात आंदोलन करणारे बाबा आढाव कोण आहेत? जाणून घ्या कारकिर्द

Baba Adhav: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी पुण्यातील फुले वाड्यात ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.
Baba Adhav
Baba Adhav
Published On

देशात आणि राज्यात नुकत्याच लोकसभा, विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकींमध्ये सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर झाल्याच्या अनेक पक्षांनी तक्रारी केली. विधानसभा निवडणूकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. परंतू ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप देखील बाबा आढाव यांनी केला आहे. त्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्यघटना आणि लोकशाहीच्या सुरु असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी ३ दिवसांसाठी आत्मक्लेश उपोषण सुरु केले आहे. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरु केलं आहे.

९४ वर्षीय बाबा आढाव उपोषणाला बसले आहेत. ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याने महायुतीचा विजय झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली. देशात लोकशाही टिकवायची असेल तर ईव्हीएम बंद झालेच पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.

Baba Adhav
Pune: पुण्यात वाहतुकीत मोठा बदल, कात्रज चौकातील उड्डाणपुलामुळे अवजड वाहनांना बंदी; कोणता रस्ता बंद, कोणता सुरू?

लोकसभा निवडणुकीलाठी निर्णय वेगळा आणि लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा कसा लागतो? असा सवाल देखील आढाव यांनी उपस्थित केला आहे. सरकारचं वर्तन हे भयानक आहे. विधानसभा निवडणुकीत असा कोणता चमत्कार झाला असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे. निवडणुकीच्या आधी पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे हा भ्रष्टाचार असल्याचं त्यांनी म्हटले आहे.

1959 मध्ये 'झोपरी संघ' ची स्थापना असो किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी काम करणे असो, बाबा बधव हे आघाडीवर राहिले. अनेक आंदोलनांमुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. त्यानंतर 1961 पासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि 1967 ला नाना पेठ मतदारसंघातून पुणे महापालिकेवर निवडून आले. महापौरपदाची निवडणूक लढवली, मात्र अवघ्या एका मताने पराभव झाला.

Baba Adhav
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी आराम करणार

शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. तसेच उद्धव ठाकरेंनी देखील बाबा आढाव यांची भेट घेतली आहे. शरद पवार म्हणाले, या निवडणुकीत एवढा मोठा खेळ होईल, असे वाटले नव्हते. याविरुद्ध जनविद्रोह करावा लागेल, अन्यथा लोकशाहीसाठी ते घातक लक्षण आहे. याआधी काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम, नाना पटोले यांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बाबा आढवांच्या आत्मक्लेश उपोषण स्थळी भेट देणार असल्याची माहिती आहे.

Baba Adhav
Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! येत्या वर्षी केंद्राकडून 300 नव्या लोकलचं गिफ्ट आणि बरंच काही...

डॉ. बाबा आढाव हे पुणे महापालिकेचे १९७० च्या दशकात नगरसेवक राहिलेत, हे समाजवादी पक्षाचे सदस्य होते. रिक्षा पंचायतीचे नेते म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाची मोहिम चालवली जात होती. बाबा आढाव त्याचे प्रणेते होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची मोठी ओळख आहे. ते 94 वर्षांचे आहेत.

Baba Adhav
Maharashtra Politics: अमरावतीत पुन्हा राणा Vs अडसूळ वाद पेटला, एकमेकांविरोधात देणार उमेदवार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com