Devendra Fadnavis: फडणवीसांना मुख्यमंत्रिपद मिळेल, या खात्रीने त्यांच्यासाठी नागपूरमध्ये शिवण्यात आला खास कोट

Devendra Fadnavis: फडणवीसांना मुख्यमंत्रिपद मिळेल, अशी खात्री असल्याने त्यांच्यासाठी नागपूरमध्ये खास कोट शिवण्यात आलाय.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavisyandex
Published On

महायुतीच्या शपथविधीची लगबग सुरु असताना आता नेत्यांच्या कोटांची जोरदार चर्चा रंगलीय. फडणवीसांना मुख्यमंत्रिपद मिळेल, अशी खात्री असल्याने त्यांच्यासाठी नागपूरमध्ये खास कोट शिवण्यात आलाय.

आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरु आहे. तर भाजपचे देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभुमीवर भावी मुख्यमंत्र्यासाठी नागपूरमधील गोविंदा कलेक्शनच्या पिंटू मेहाडियांनी फडणवीसांच्या आवडत्या रंगाचे चार कोट शिवलेत.

Devendra Fadnavis
Parliament Winter Session: संभल हिंसाचारावर विरोधक चर्चेवर ठाम; विरोधी खासदारांचा लोकसभेतून सभात्याग

मागील सरकारमध्ये मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटची जोरदार चर्चा रंगली होती. त्यात आता छगन भुजबळ यांनीही नवा कोट शिवलाय. या कोटसंदर्भात आणि मंत्रिपदासंदर्भात प्रश्न विचारला असता भुजबळांनी मिश्किल टिपण्णी केलीय.

Devendra Fadnavis
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे प्रखर हिंदुत्वाकडे; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काय रणनीती ठरली? वाचा बैठकीची Inside स्टोरी

5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होणार आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार? हे ठरलं नसलं तरी नागपूरच्या पिंटू मेहाडियांना फडणवीसच मुख्यमंत्री होण्याची खात्री आहे. त्यामुळेच पिंटू मेहाडियांनी आपल्या लाडक्या देवाभाऊंसाठी निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या शेडचे कोट शिवले आहेत. त्यामुळे या कोटची घडी मोडून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की भाजप ऐनवेळी नवा चेहरा देणार? याकडे लक्ष लागलंय.

Devendra Fadnavis
Maharashtra Politics: नागपुरातील चहावाला जाणार महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी कार्यक्रमाला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com