Uddhav Thackeray
Uddhav Thackerayyandex

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे प्रखर हिंदुत्वाकडे; मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काय रणनीती ठरली? वाचा बैठकीची Inside स्टोरी

Mumbai BMC Election 2024: विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा कडू घोट पचवून ठाकरे पुन्हा कामाला लागले. आता एकच लक्ष्य मुंबई महानगरपालिका.
Published on

राज्यातील विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे आपला शेवटचा गड वाचवण्यासाठी कामाला लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशामुळे शिवसेनेचा अभेद्य किल्ला अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय होणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

शिवसेनेकडून हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मुंबई महापालिका निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचवा, हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत आहे उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार. आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्याला योग्य तो प्रतिवाद करा, उद्धव ठाकरेंच्या माजी नगरसेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत. भाजप पक्षाचे बाहेरच्या राज्यातून लोक येऊन पक्षासाठी काम करतात, तसं आपणही तळागाळात जाऊन काम केलं पाहिजे असं मत उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांसमोर मांडलं.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics: नागपुरातील चहावाला जाणार महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी कार्यक्रमाला

उद्धव ठाकरे यांच्याकडून ठाकरेंच्या माजी नगरसेवकांना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आले. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागा. मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे. ईव्हीएमचा मुद्दा तर आहे मात्र त्याबाबत आम्ही बघू तुम्ही संघटनात्मक बांधणी आणि ताकतीने कामाला लागा. निवडणुका कधीही लागतील त्यामुळे गाफील राहू नका. पुन्हा लोकांमध्ये जा आणि नव्याने ताकतीने कामाला लागा असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Parliament Winter Session: संभल हिंसाचारावर विरोधक चर्चेवर ठाम; विरोधी खासदारांचा लोकसभेतून सभात्याग

मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेना गोंजारेल, निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचेय ते शिंदेंच्या बाबतीत करतील. RSS चा आव आणून त्याखाली भाजपने वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या. आरएसएस पत्रक वाटाण्यापुरती होती. सध्या सुरु असलेल्या सत्ता स्थापनेच्या नाट्यामागे शिंदेंच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे. मुंबई महापालिका जिंकायाची आहे. लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबिर बोलावणार. मुंबईतील गटप्रमुखांचेही शिबिर घेणार असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Sanjay Raut: 'गृहमंत्रिपद हा एकच वादाचा विषय नाही', संजय राऊतांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com