Pigeon: पारव्यांना खायला देताय! थांबा, महापालिका ठोठावणार ५ हजार रुपये दंड

Pigeon: पक्ष्यांना उघड्यावर खायला देऊ नये, असे आवाहन यापूर्वी महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेले आहे. पारव्यांमुळे वेगवेगळे श्वसनाचे आजार होत असल्याचे समोर आले आहे.
Pigeon
Pigeonyandex
Published On

पुणे शहरतील अनेक भागात पारव्यांना तसेच कबुतरांना खाद्य म्हणून पोतेच्या पोते धान्य टाकले आहेत. पक्ष्यांना खायला घातले की पुण्य मिळतं, या आशेने अनेक पक्षप्रेमी पक्षांसाठी धान्य टाकत असल्याचे प्रकार समोर आले आहे. या पारव्यांमुळे श्‍वसनाचा आजार होत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आता यापुढे अशा प्रकारे खाद्यपदार्थ, धान्य टाकणाऱ्यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

घनकचरा विभागाकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण केल्याचा ठपका ठेवून या नागरिकांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. शहरामध्ये गेल्या काही वर्षापासून पारव्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, "पारव्यांमुळे नागरिकांना आजार होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना खाद्य म्हणून धान्य किंवा अन्य पदार्थ देणाऱ्यांवर अस्वच्छता निर्माण केल्याने दंड केला जाईल. ही कारवाई घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून केली जाईल. या पारव्यांच्या पिसांमुळे आणि विष्ठेतील जंतूंमुळे हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया या आजाराची लागण नागरिकांना होत आहे. हा रोग फुफ्फुसाशी संबंधित आहे.

Pigeon
Devendra Fadnavis: मी पुन्हा आलो! देवेंद्र फडणवीसच होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

शहरातील चौकाचौकात, महत्त्वाच्या रस्त्यावर, नदीपात्र यासह अन्य ठिकाणी पारव्यांना खाद्य पदार्थ, धान्य टाकण्याचे प्रमाण मोठे आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास महापालिकेकडून ५०० रुपये दंड घेतला जात होता. पण काही महिन्यांपूर्वी दंडाची रक्कम वाढवून ती ५ हजार रुपये इतकी केली आहे. त्यामुळे पारव्यांना धान्य टाकणे नागरिकांना चांगलेच महागात पडणार आहे.

Pigeon
Mahaparinirvan Din: महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी मुंबईत स्थानिक सुट्टी, सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे शिंदेंचे निर्देश

त्यामुळे कोणीही त्यांना खाण्यासाठी रस्त्यावर धान्य टाकू नये असे आवाहन करत पक्षांना खायला देताना आढळल्यास संबंधित नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा देखील महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेला आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे आता महापालिकेने याबाबत जनजागृती करत उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे.

Pigeon
Kolhapur News: कप केकने घेतला जीव, विषबाधेमुळे सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू; कोल्हापूरातील धक्कादायक घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com