Mahayuti guardian minister Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : गोगावले-तटकरे जुगलबंदी, पालकमंत्रिपदासाठी देवाला साकडं| VIDEO

Gogawale vs Tatkare: रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन सुरु असलेल्या गोगावले-तटकरे संघर्षात एका कार्यक्रमात दोघांची हास्यविनोदाने भरलेली जुगलबंदी रंगली. भरत गोगावले यांनी मंत्रिपदासाठी देवाकडे साकडं घातलं आहे.

Bharat Mohalkar

Mahayuti leaders Bharat Gogawale and Sunil Tatkare : रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन गोगावले विरुद्ध तटकरे संघर्ष रंगलाय. मात्र एका यादव गवळी समाजाच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची चांगलीच जुगलबंदी रंगली आणि प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उडाले... नेमकं काय घडलं आणि गोगावलेंनी देवाकडे काय साकडं घातलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये....

मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनील तटकरे दोघंही महायुतीत.... मात्र दोघांमधील सुप्त संघर्ष काही कमी होत नाही... त्यातच रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद कायम असतानाच मंत्री भरत गोगावले आणि सुनील तटकरे हे पारंपरिक विरोधक यादव गवळी समाजाच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन समारंभाला एकत्र आले.. यावेळी दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली .

रायगड जिल्ह्यात तटकरे विरुद्ध शिंदे गट हा वाद जुनाच आहे... त्यातच महाविकास आघाडी सरकार असताना आदिती तटकरेंना पालकमंत्रिपद दिल्याने तत्कालिन शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले होते. पुढे अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर भरत गोगावलेंसह शिंदे गटाची गोची झाली.. तर नव्या सरकारमध्येही आदिती तटकरेंना रायगडचं पालकमंत्रिपद देण्यात आलं.. त्यावर भरत गोगावलेंसह तटकरेंनी जोरदार आक्षेप नोंदवला.. त्यामुळे पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली... मात्र आता अमित शाहांच्या दौऱ्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे..

आता भरत गोगावलेंनी इच्छा पूर्तीसाठी केलेलं मागणं देव ऐकणार की मंत्रिपदाप्रमाणेच गोगावलेंना पालकमंत्रिपदासाठीही ताटकळत रहावं लागणार, याकडे लक्ष लागलंय. मात्र राज्यात राजकीय टीकेची पातळी घसरत असताना रायगडमध्ये तटकरे-गागवलेंमधील जुगलबंदी आश्वासक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad To Arnala Fort: रायगड किल्ल्यावरून अर्नाळा किल्ल्यापर्यंत प्रवास कसा कराल? जाणून घ्या प्रमुख टप्पे आणि टिप्स

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Mercury transit: 50 वर्षांनंतर नागपंचमीला शनीच्या नक्षत्रात बुध करणार प्रवेश; 'या' राशींचं नशीब पालटणार, आर्थिक स्थिती सुधारणार

राजकीय भूकंप! शरद पवार गटातील बड्या नेत्याचे शिलेदार भाजपच्या वाटेला; उल्हासनगरमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT