Walmik Karad encounter plan : कराडच्या एन्काऊंटरचा कसा आखला प्लॅन? तो दावा करणारा निलंबित पीएसआय कोण?

Ranjit Kasle claim : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर होती, असा दावा निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी केला आहे. या प्रकरणामुळे नवा वाद उफाळला आहे.
Walmik Karad encounter plan
Walmik Karad encounter plan
Published On

Walmik Karad encounter plan : सरपंच हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर दिल्याचा दावा निलंबित पीएसआयने केलीय.. मात्र हा दावा करणारा निलंबित पीएसआय कोण आहे? कराडच्या एन्काऊंटरचा कसा आखला होता प्लॅन? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

निलंबित पीएसआय कासलेचा दावा

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय.. हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरसाठी कोट्यवधींची ऑफर होती, असा खळबळजनक दावाच निलंबित पीएसआय रणजित कासलेने केलाय. सायबर विभागात असताना आपल्याला बोलावून ही ऑफर दिल्याचा दावा कासलेंनी केलाय.

Walmik Karad encounter plan
Beed : वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर, पोलीस अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ, व्हिडिओ व्हायरल

एवढंच नाही तर रणजित कासलेंनी एन्काऊंटर कसा केला जातो? त्याची थिअरीच मांडलीय..

एन्काऊंटरसाठी एक अधिकारी, 2 अंमलदार, हवालदार अशी टीम बनवली जाते

या टीमसोबत सरकारची उच्चस्तरीय गुप्त बैठक होते

यानंतर आणखी एक विश्वासू लोकांची टीम बनवली जाते

एन्काऊंटर केल्यानंतर टीमला 5 ते 50 कोटींपर्यंतची रक्कम दिली जाते

एन्काऊंटर प्रकरणातून निर्दोष सोडण्याचं आश्वासन दिलं जातं

Walmik Karad encounter plan
Karuna Sharma : धनंजय मुंडेंनी मला ५० कोटींची ऑफर दिली होती; करुणा शर्मा यांचा गौप्यस्फोट, VIDEO

सरपंच हत्या प्रकरणात अटकेनंतर वाल्मिक कराडला बीड तुरुंगात ठेवण्यात आलंय... मात्र याच तुरुंगात कराडचा काटा काढण्यासाठी 50 कोटींपर्यंतची ऑफर दिल्याचा दावा रणजित कासलेंनी केलाय.. मात्र रणजित कासले कोण आहेत? पाहूयात...

कोण आहे रणजित कासले?

रणजित कासले हा निलंबित पीएसआय

कासले बीड पोलीस दलात कार्यरत होता

कासलेची गुजरातमध्ये जात व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकी

25 मार्च 2025 - खंडणीचा व्हिडीओ समोर येताच निलंबन

मात्र अंजली दमानियांनी रणजित कासलेचा दावा खळबळ निर्माण करण्यासाठी असल्याचं म्हटलंय. बीड कारागृहात वाल्मिक कराडवर महादेव गित्तेने हल्ला केल्याचं समोर आलंय.. त्यानंतर गित्ते गँगला संभाजीनगर जिल्ह्यातील हरसूल कारागृहात हलवण्यात आलं...आता रणजित कासलेंनी नवा दावा केलाय.. मात्र या दाव्यात तथ्य असेल तर कराडचा एन्काऊंटर करुन कुणाला वाचवण्याचा प्लॅन आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com