Karuna Sharma : धनंजय मुंडेंनी मला ५० कोटींची ऑफर दिली होती; करुणा शर्मा यांचा गौप्यस्फोट, VIDEO

Karuna Sharma on Dhananjay Munde : करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठा गौफ्यस्फोट केला आहे. त्यांनी मला ५० कोटींची दिल्याचा ऑफर गौफ्यस्फोट केला आहे.
karuna sharma on dhananjay munde
Karuna SharmaSaam tv
Published On

मुंबई : माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुण शर्मा यांचा वाद वांद्रे सत्र न्यायालयात पोहोचला आहे. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबत अधिकृत लग्न केलं नसल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात केला. तर दुसरीकडे कोर्टाने धनंजय मुंडेंसोबत लग्न झाल्याचा पुरावा करुणा शर्मा यांच्याकडे मागितला आहे. याचदरम्यान, धनंजय मुंडे यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे सांगण्यासाठी ५० कोटींची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट करुणा शर्मा यांनी केला आहे.

साम टीव्हीच्या 'ब्लॅक अँड व्हाईट' कार्यक्रमात करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. करुणा शर्मा म्हणाल्या,'धनंजय मुंडे राजकीय करिअर खराब करुन काय मिळते. मला पैशांसाठी काय करायचे असते, तर २०१९ मध्ये केले असते. मी धनंजय मुंडे यांच्या वाईट काळात सोबत होते. २०१९ च्या निवडणुकीत माझे मंगळसूत्र गहाण ठेवले होते. माझ्याकडे पुरावे आहेत'.

karuna sharma on dhananjay munde
Maharashtra Politics : युतीचा पोपट २०१४ साली मेला, आता सर्वाधिक आमदार निवडून आले; शिंदे गटाच्या महिला नेत्याने सांगितलं कारण

'धनंजय मुंडे यांनी अब्रू नुकसानीचा दावा ठोकला होता. त्यावेळी मला ५० कोटींची ऑफर दिली होती. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात असल्याचे सांगण्यासाठी ५० कोटींची ऑफर दिली होती. १८ कोटी कोर्टाच्या समोर देणार आणि बाकीची रक्कम बाहेर देणार असे ठरले होते, असा गौप्यस्फोट शर्मा यांनी केली.

karuna sharma on dhananjay munde
Shocking News : वंशाच्या दिव्यासाठी बाप झाला हैवान; ५ महिन्यांच्या जुळ्या मुलींना जमिनीवर आपटून ठार मारलं

मुंडे यांच्या पत्नीवर भाष्य करताना शर्मा म्हणाल्या, 'धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री आणि माझ्यामध्ये फोनवर बोलणं होत होते. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. आम्हाला दोघींना काहीही प्रॉब्लेम नव्हता. आम्ही समजून चांगल्या पद्धतीने घेतलं होतं'.

karuna sharma on dhananjay munde
Myanmar Earthquake : म्यानमार पुन्हा भूकंपाने हादरलं; आतापर्यंत १००० हून अधिक जणांचा मृत्यू, २३७६ जखमी

उदरनिर्वाह कसा चालतो? पैसा मिळत नाही म्हणून आरोप करतात का? यावर उत्तर देताना करुणा शर्मा म्हणाल्या,' मला फ्लॅट दिला. ते कर्ज माझ्यावर आहे. माझ्यासाठी धनंजय मुंडे यांनी खूप प्रॉपर्टी खरेदी केली होती. २००९ मध्ये धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात वाद झाला. त्यावेळी मी त्यांना सर्व प्रॉपर्टी दिली. आता मी रस्त्यावर आले. आता इंदोरमध्ये माझी प्रॉपर्टी आहे. त्यावर माझा उदरनिर्वाह चालतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com