Maharashtra politics : अंगावरचा गुलाल निघण्याआधीच माझ्यावर खुनाचा गुन्हा, जयकुमार गोरेंचा पवारांवर खळबळजनक आरोप

Maharashtra political controversy : गुलाल निघण्याआधीच माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला. गोरे यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष आरोप केला. सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडवली आहे.
Jaykumar Gore allegation on Sharad Pawar accused indirectly
Jaykumar Gore allegation on Sharad Pawar accused indirectly Jaykumar Gore
Published On

भारत नागणे, पंढरपूर प्रतिनिधी

Jaykumar Gore allegation on Sharad Pawar accused indirectly : मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर थेट नाव न घेता खळबळजनक आरोप केला आहे. अंगावरचा गुलाल निघण्याआधीच माझावर खुनाचा गुन्हा करण्यात आला, मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा जयकुमार गोरे यांनी केला. सोलापूरमधील माळशिरस येथील नागरी सत्कार समारंभात बोलताना त्यांनी खळबळजनक आरोप केला.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा गुलाल निघण्याआधीच आपल्यावर खुनाचा खोटा गुन्हा दाखल करून अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा गोरे यांनी केला. गोरे यांनी हा गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. गोरे रविवारी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. माळशिरसमध्ये त्यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ पार पडला, त्यावेळी बोलताना गोरे यांनी खळबळजनक आरोप केला.

Jaykumar Gore allegation on Sharad Pawar accused indirectly
Maharashtra politics : अजितदादांचा ठाकरेंना धक्का, रायगडच्या हुकमी एक्क्याने मशाल सोडली

जयकुमार गोरे म्हणाले, खासदार असताना एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं पोरगं आमच्या आशीर्वादाशिवाय आमदार कसं होतं, असा प्रश्न विचारणाऱ्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. २००९ मध्ये मी अपक्ष आमदार म्हणून निवडून आलो हेतो. त्यावेळी माझ्यावर सदाशिव तात्या यांच्या खूनाची सुपारी दिल्याचा आणि पोलिसांनी फायरिंग केल्याचा बनावट आरोप ठेवण्यात आला. विजयाचा गुलाल निघण्याआधीच मला अडकवण्याचा हा प्रयत्न होता. जे पाकिस्तानातही घडणार नाही, असे कृत्य इथे घडल्याचे दाखवण्यात आले. दरम्यान, जयकुमार गोरे यांनी थेट शरद पवार यांचा उल्लेख टाळला, परंतु ‘खासदार’ असा संदर्भ देत आपला संघर्ष तेव्हापासून सुरू असल्याचे सांगितले.

Jaykumar Gore allegation on Sharad Pawar accused indirectly
Mehul Choksi Arrested: पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीला अटक, बेल्जियममध्ये ठोकल्या बेड्या

एक पोरगं विधानसभेत अपक्ष निवडून येतं, याचा राग काहींना होता. तरीही मी संघर्ष करत आज इथपर्यंत पोहोचलो, असेही गोरे म्हणाले. मंत्री जयकुमार गोरे यांच्या या आरोपांमुळे सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली असून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com