Nashik Student News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : कंडोमचं पाकीट, फायटर अन् लोखंडी कडे; आठवीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात आक्षेपार्ह साहित्य, VIDEO

Nashik Student News : आता बातमी आहे पालकांची चिंता वाढवणारी... नाशिकच्या घोटी मधील एका शाळेत चक्क विद्यार्थ्यांच्या दप्तरात आक्षेपार्ह साहित्य सापडलंय...शाळेच्या उपमुख्याध्यापकांनी अचानकपणे विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेमुळे शिक्षकांसह पालकांमध्येही खळबळ उडालीय. पाहुयात यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Saam Tv

आठवीतल्या विद्यार्थ्यांचा हा वर्ग...या वर्गातील काही मुलांच्या दप्तरात पुस्तकं आणि वह्यांऐवजी आढळलीत चक्क कंडोमची पाकिटं ..एवढंच नव्हे तर फायटर, लोखंडी कडे, पत्ते, अंमली पदार्थ आणि सायकलची चेन ही....या सर्व वस्तू विद्यार्थ्यांच्या दप्तरात आढळून आल्यात. घोटीतील एका खासगी शिक्षण संस्थेतील शाळेमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय. शाळेतील उपमुख्याध्यापकांनी अचानकपणे विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली. आणि शाळेतील आठवी आणि नववीच्या वर्गातील सहा मुलांच्या दप्तरात या वस्तू सापडल्या.

या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. शिक्षकांनी संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून घेतल्यानंतर घडलेल्या प्रकारामुळे पालकांना देखील मोठा धक्का बसला. शिक्षकांनी पालकांसमोर विद्यार्थ्यांना चांगलीच समज देखील दिलीय. केवळ एवढ्यावरच न थांबता शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या केसांची स्टाईल ठेवून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेतच केस कापण्यात आले.

विद्यार्थ्यांना शिस्त लावणं ही केवळ शिक्षकांचीच नव्हे तर पालकांची देखील जबाबदारी आहे. शाळेतून पाल्य घरी आल्यानंतर विश्वासात घेऊन पाल्याशी बोलणं, त्याच्या मित्रमैत्रिणींची माहिती ठेवणं गरजेचं आहे. कारण सोशल मीडियाच्या प्रभावामुळे विद्यार्थी भरकटत चालल्याचे प्रकार याआधी देखील समोर आलेत.

घोटीच्या शाळेतील उपमुख्याध्यापकांनी जशी अचानकपणे विद्यार्थ्यांच्या दप्तरात नेमकं काय आहे याची तपासणी केली, तशीच तपासणी अधून मधून अन्य शाळांमध्ये देखील शिक्षकांनी करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

WhatsApp Security : व्हॉट्सअ‍ॅप कधीच होणार नाही हॅक, सायबर एक्सपरर्टने दिला भन्नाट सल्ला

Maharashtra Live News Update: राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

SCROLL FOR NEXT