Beed Accident : अनेक वर्षांची मैत्री अपघाताने तुटली; भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

Beed Accident update : बीडमध्ये नेकनूर-येळंबघाट रस्त्यावर भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला.
Beed
Beed Accident Saam tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड : राज्यात अपघाताचे सत्र सुरुच आहे. बीडच्या नेकनूर-येळंबघाट रस्त्यावर भरधाव वाहन आणि दुचाकीचा अपघात झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. बीडमध्ये सोमवारी रात्री आठ वाजता भीषण अपघात झाला. बीडमधील भीषण अपघातामुळे रस्त्यावर स्थानिकांची एकच धावाधाव झाली.

Beed
Tanisha Bhise death case : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा

मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या नेकनूरजवळ येळंबघाटकडे सोमवारी रात्री आठ वाजता दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत दोन युवकांचा मृत्यु झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमीवर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Beed
Virat Kohli Record : शतक हुकलं, पण इतिहास रचला; विराट कोहली अनोखा विक्रम करणारा ठरला भारतीय फलंदाज

बीडच्या नेकनूर येथील मिस्त्री काम करणारा युवक गणेश श्रीधर घरत (वय २९) याचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर येळंबघाट येथील युवक पठाण अफजल पठाण अमजद (वय १७) याचा उपचारादरम्यान बीड येथे मृत्यू झाला. नेकनूर येथील बाबा कांबळे (वय ३८) हा गंभीर जखमी झाला आहे. ३८ वर्षीय बाबा कांबळेवर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास नेकनूर पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल रतन निगुळे, उबाळे हे करीत आहेत.

Beed
Thane water cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार, कधी अन् कोठे? वाचा

वर्ध्यात डुक्कर आडवे आल्याने घात, मायलेकाता मृत्यू

वर्ध्यात डुक्कर आडवे आल्याने कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. डुक्कर आडवे आल्याने कार टँकरला धडकली. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर आहेत. समुद्रपूर वर्धा मार्गांवरील तरोडा शिवारात ही घटना घडली आहे. अपघातात माय-लेकाचा मृत्यू झाला. तर पती आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. प्रियंका प्रशांत वैद्य (वय 37),प्रियांश प्रशांत वैद्य (वय 8 वर्ष ) अशी मृतकांची नावे आहेत. तर प्रशांत मधुकर वैद्य (43 वर्ष ) आणि माही प्रशांत वैद्य (3 वर्ष ) अशी जखमींची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com