Thane water cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार, कधी अन् कोठे? वाचा

Thane water cut update : ठाणेकरांनो पाणी जपून वापरण्याची गरज आहे. ठाण्यात बुधवारी काही भागात पाणीबाणी पाहायला मिळणार आहे.
Thane water cut update
Thane water cutSaam tv
Published On

ठाणेकरांसाठी पाणीपुरवठ्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेच्या हद्दीत मुख्यजलवाहिनीस गळती होत आहे. ठाण्यातील मानकोली एम.बी.आर येथील मुख्यजलवाहिनीस गळती होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांनी मुख्यजलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे.

ठाणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची होणारी गळती बंद करणे आवश्यक आहे. महापालिकेने स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पिसे ते टेमघर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ जोडण्या खंडीत करण्यासाठी बुधवार दिनांक ०९/०४/२०२५ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत शटडाऊन घेऊन सदरची कामे करण्याचे नियोजन केलं आहे. यासाठी महापालिका स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा आणि मे. स्टेम प्राधिकरणाच्या योजनेचा १२ तासाचा शटडाऊन घेवून तातडीची कामे हाती घेणार आहे.

Thane water cut update
Shocking : बाप नव्हे सापच! नराधमाने तोडले मुलीच्या अब्रुचे लचके; नातीने रडत रडत आजीला सांगितली आपबीती

परिणामी येत्या बुधवार सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिध्दांचल, इंदिरानगर, रुपादेवी श्रीनगर, समतानगर, सिध्देश्वर, ईटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवाचा काही भाग इत्यादी भागात १२ तासांसाठी पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Thane water cut update
Fadnavis Government : फडणवीस सरकारने 100 दिवसांत जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या का? पाहा व्हिडिओ

पुण्यात काही भागात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार

पुण्यातील काही भागात मंगळवारी म्हणजे उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. खडकवासला, वारजे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जोडणाऱ्या रॉ वॉटर लाईन सांडपाणी वाहिनीच्या कामामुळे काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गळती थांबवण्यासाठी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मंगळवारी दुरुस्तीची कामे हाती घेतली आहे. यामुळे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे.

Thane water cut update
Tanisha Bhise death case : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा

पुणे शहरातील वारजे, शिवणे औद्याोगिक परिसर, कर्वेनगर, शिवाजीनगर, गोखलेनगर, भोसलेनगर, पाषाण, बाणेर, बालेवाडी, कोथरूड आणि खडकीचा काही भागाचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. या दुरुस्ती कालावधीमध्ये टँकरने केला जाणारा पाणी पुरवठा देणे शक्य होणार आहे. त्यामुळे मंगळवारी पुणेकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com