Beed News: बीडमध्ये पुन्हा संतोष देशमुख होणार? जमिनींसाठी खंडणी, धमक्या; शेतकऱ्यांचा गावगुंडांकडून छळ

Beed Farmers Demand Action Against Land Grabbers: बीडमध्ये पुन्हा गावगुडांचा कहर, शेतकऱ्यांच्या १३८ एकर जमिनी बळकावण्याचा प्रयत्न, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.
beed
beedSaam
Published On

बीडमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणानंतर आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. काही गावगुंडांनी शेतकऱ्यांच्या १३८ एकर जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. या जमिनी पवन उर्जा प्रकल्पासाठी वापरण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या या धक्कादायक आरोपानंतर कायदा आणि सुवव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बीडच्या शिरूर तालुक्यातील दगडवाडी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी सिताराम नागरे, बाबासाहेब नागरे, रवींद्र नागरे, किसन कठाळे, राम नागरे, गणेश कठाळे आणि महादेव कठाळे या सात शेतकऱ्यांच्या जमिनींवर बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना दररोज "पाच लाख रुपये द्या आणि एक एकर जमीन द्या" अशी धमकी राजकीय आश्रय असलेल्या गावगुंडांकडून देण्यात येत आहे.

beed
Pune News: गे डेटींग ॲपवर ओळख, भेटायला गेला; रात्रीच्या वेळी त्याच्यासोबत असं काही घडलं की..

शेतकऱ्यांनी यासंदर्भात बीड जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली. तसेच पाटोदा, बीड आणि छत्रपती संभाजीनगर येथील हायकोर्टातही शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय आलेला आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, गावगुंड या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन, त्या पवनचक्की प्रकल्पासाठी खासगी कंपन्यांना देत आहेत, आणि त्यातून लाखो रुपयांचा आर्थिक लाभ मिळवण्याचा डाव रचला जात आहे. यासाठी खंडणी मागितली जात आहे आणि नकार देणाऱ्यांना धमकावले जात आहे.

beed
Devendra Fadnavis: डिजिटल अरेस्टमध्ये शिकलेलेही अडकतात, मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई पोलिसांना दिले आदेश

या पार्श्वभूमीवर, संतोष देशमुख यांची हत्या आणि मस्साजोग परिसरातील पवन ऊर्जा प्रकल्प यांचा संभाव्य संबंध तपासण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. या घटनेने बीड जिल्ह्यातील शेतकरी भयभीत असून, त्यांनी “आम्हाला न्याय द्या” अशी मागणी पत्राद्वारे शासनाकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com