
सायबर गुन्हेगारी ही भविष्यातील सर्वात मोठी आव्हाने ठरणार असून, ती पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल पुर्णपणे सक्षम आणि सज्ज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणावेळी स्पष्ट केलं आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी विविध पोलीस उपक्रमांचे लोकार्पण केले. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "सायबर गुन्हेगारी रोखणे आणि सायबर गुन्हेगारांना पकडणे हे भविष्यातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. हे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दल सज्ज आहे", असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. तसेच "मुंबईतील सर्वच पोलीस स्थानकांमध्ये महिला तसेच नागरिक केंद्रीत सोयी सुविधांची उभारणी करण्यात आली असून, पोलीस स्थानके ही जास्तीत जास्त लोकाभीमूख झाली" असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.
महाराष्ट्र हा सायबर गुन्हेगारी नियंत्रणामध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्याची मुंबई पोलीसांची क्षमता मोठी आहे. सायबर गुन्ह्याच्या एक प्रकरणात १२ कोटी रुपये वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. भविष्यातील सायबर गुन्ह्यांचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई पोलीस दलाने आतापासूनच अनेक उपक्रम हाती घेतले असून, सायबर गुन्हे रोखण्यासाठी महत्वाचे असलेले अत्याधुनिक तीन सायबर लॅब उभारण्यात आले आहे. या लॅबचे आज लोकार्पण करण्यात येत आहे", असं फडणवीस म्हणालेत.
"डीजिटल अरेस्टसारख्या प्रकरणांमध्ये चांगले सुशिक्षीत लोकही पैसे देत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सुशिक्षीत असलेल्या डिजीटल अशिक्षीतांनाही शिकवण्याची गरज आहे. त्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. त्यासाठीही मुंबई पोलीस विविध उपक्रम राबवत आहे. त्यांच्या या उपक्रमात साथ देणारे अभिनेते अयुष्यमान खुराणा आणि निर्माते साहित कृष्णन यांचे अभिनंदन करतो", असं मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "केंद्र सरकारने आणलेले नवीन तीन कायदे हे खऱ्या अर्थाने भारतीय असल्याचे सांगून गुन्हे प्रकटीकरण, पुरवा याविषयीच्या कायद्यामुळे आता गुन्ह्यांवर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. गुन्ह्याच्या तपसकामी तंत्रज्ञान वापरासही आता परवानगी मिळालेली आहे. महिलांमध्येही आता बदल होत असून, पुर्वी समाजिक दबावांमुळे महिलांविषयीच्या गुन्ह्यांची नोदणी कमी होती, आता त्यामध्ये वाढ झाली आहे, ही एक चांगली बाब आहे", असे मुख्यमंत्री म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.