Wardha: आई- वडील मंदिरात, चिमुकली बाहेर; अंगावर झाड कोसळलं अन् ३ वर्षीय चिमुकलीनं श्वास सोडला

Tree Falls on 3-Year-Old Girl at Temple Instant Death: मरीमाय मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू. झाड अंगावर कोसळल्यामुळे झाला मृत्यू.
Wardha
WardhaSaam
Published On

अंगावर झाड कोसळल्याने चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. चिमुकलीची आई मरीमाय मंदिरात नैवेद्य दाखवायला गेली होती. या दरम्यान, चिमुकली मंदिराच्या बाहेर खेळत होती. खेळत असताना तिच्या अंगावर झाड कोसळले आहे. झाड अंगावर कोसळल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

घटना घडल्यानंतर चिमुकलीजवळ आई आणि वडील धावून गेले. स्थानिकांच्या मदतीने झाड बाजूला करण्यात आले. तिला खासगी रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

शरद दंडारे आणि त्यांची पत्नी आणि मुलगी तिघेही पुलगाव मार्गावरील शोभा काळे यांच्या शेतातील मरीमाय माता मंदिरात गेले होते. नवरात्री नवमीनिमित्त नैवेद्य आणि दर्शनाकरिता तिघेही एकत्र गेले. आई, वडील मरीमायची पूजा करत नैवद्य चढवत होते. तर मुलगी पूर्वा दंडारे (वय वर्ष ३) ही मंदिराबाहेर बाहेर खेळत होती.

Wardha
Shocking News: "लव्ह यू आई, माझ्या भावाची काळजी घे गं.."सुसाईड नोट लिहून ११ वीत शिकणाऱ्या तरूणीनं घेतला गळफास; कारण फक्त इतकंच..

दरम्यान, जोरात सोसाट्याचा वारा सुटला. या वादळात बाहेर वाळलेले झाड कोसळले. झाडाखालीच चिमुकली देखील खेळत होती. झाड कोसळल्यामुळे ती झाडाखाली दबली गेली. घटना लक्षात येताच आई-वडिलांनी हंबरडा फोडत त्या ठिकाणी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने झाड बाजूला करण्यात आली.

Wardha
Summer: उन्हाळ्यात दिवसाला किती लिटर पाणी प्यावं?

झाड बाजूला केल्यानंतर तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. या दुर्देवी घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. चिमुकलीचा असा मृत्यू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com