Sonu Sood Nagpur Accident: बायकोच्या अपघातानंतर सोनू सूदचा चाहत्यांना मोलाचा सल्ला, म्हणाला, सीट बेल्ट लावा नाहीतर...

Sonu Sood Latest News: अभिनेता सोनू सूद यांची पत्नी सोनाली आणि इतर दोघे यांच्या नागपुरात झालेल्या अपघातानंतर सीट बेल्ट लावण्याचे आवाहन सोनू सूद यानी व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर करून केले आहे.
Sonu Sood Latest News
Sonu Sood Nagpur AccidentSaam tv
Published On

अभिनेता सोनू सूद त्याची पत्नी आणि मेहुणी यांचा नागपुरमध्ये अपघात झाला. या बातम्या सध्या सोशल मिडीयावर प्रचंड पसरत आहेत. नागपूरमधील वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलावर एका ट्रकशी यांची कार धडकली आणि हा अपघात झाला. अपघाताचा सगळा प्रसंग अभिनेता सोनू सूद याने त्याच्या सोशल मिडीयावर व्हिडीओच्या माध्यमातून सांगितला आहे. त्यामध्ये नागपुरात झालेल्या अपघातानंतर सीट बेल्ट लावण्याचे आवाहन सोनू सूद याने व्हिडीओच्या माध्यमातून फॅन्सला दिले. आता सोनू सूदची पत्नी सोनाली व मेहूणी इस्पितळात आहेत. ही सर्व घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

अभिनेता सोनू सूद सोबत घडलेल्या घटनेत कारचा पार चेंदामेंदा झाला होता. तर कारच्या बोनेटचाही अगदी चोथा झाला होता. त्यामध्ये सोनाली समोरील सीटवर बसल्या होत्या व त्या अत्यंत जखमी झाल्या होत्या. मात्र कारच्या एअरबॅग्ज उघडल्यामुळे सुदैवाने कोणतीच जिवीत हानी झाली नाही. यावरूनच सोनू सूद याने त्याच्या सोशल मिडीयावर व्हिडीओ शेअर केला आहे.

Sonu Sood Latest News
Natural Weight Loss Tips: ना डाएट ना जिम... आहारात करा फक्त 'हे' बदल, वजन होईल झटपट कमी

कारमध्ये सोनाली सूद आणि त्यांच्या सोबतचे दोन प्रवाशी यांनी सीट बेल्ट लावले होते. त्यामुळे इतका भीषण अपघात होवूनही तिघांचेही प्राण वाचले असे सोनू सुद आपल्या व्हिडिओत मागच्या सीटवर बसून सांगितले. त्यामुळे कारमधील प्रत्येक प्रवाशाने प्रवास करतांना विशेषता मागच्या प्रवाश्यांनी सुद्धा सीट बेल्ट लावावा असे आवाहन आव्हान सोनू सुद याने केले आहे.

नेमकं काय घडलं?

सोनू सूद त्याची पत्नी आणि मेहूणी व आणखी नातेवाईक बाहेरगावाहून सोमवारी रात्री नागपुरला येत असताना हा अपघात घडला. नागपूरमधील वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलावर एक ट्रक मागून येऊन कारला धडकला. त्यामुळे कारचा मोठा अपघात झाला. त्यामध्ये कारचा पार चोथा झाला. मात्र जिवित हानी नाही झाली. सध्या सोनू सूद आणि त्याच्या कुटुंबाची प्रकृती स्थिर आहे.

Sonu Sood Latest News
Ambedkar Jayanti: आयुष्यात खूप मोठं नाव कमवायचयं? मग आंबेडकरांचे 'हे' विचार एकदा वाचाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com