Saam Tv
१४ एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांची जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
''शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा'' हा मूळ मंत्र आंबेडकरांनी दिला.
आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी काही महत्वाचे सल्ले दिले आहेत.
आंबेडकरांचे पुढील सल्ले तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यास प्रचंड फायदेशीर ठरतील.
शिक्षण जसे पुरुषांसाठी आवश्यक आहे तसे महिलांसाठी सुद्धा आहे.
शिक्षण सामाजिक परिवर्ताचे माध्यम आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिक्षण पूर्ण करा.
शिक्षणा बद्दल आंबेडकर म्हणतात, 'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.''
आंबेडकरांच्या मते, कोणत्याही समाजाची प्रगती त्यांच्या शिक्षणाचे पदव्यांनी मोजावी. त्यामध्ये महिलांचा समावेश असावा.
आंबेडकरांच्या मते, जे इतिहास लक्षात ठेवत नाहीत, ते कधीच इतिहास घडवू शकत नाहीत.